Sonali Phogat: सोनाली फोगटची तब्येत बिघडली अन् त्या दोघींनी कलटी मारली; कोण होत्या, नेमके संबंध काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:52 IST2022-08-30T10:51:55+5:302022-08-30T10:52:26+5:30
हणजूण पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असताना आता सोनालीच्या मृत्यूचा कट हरयाणात रचल्याची माहिती समोर येत आहे.

Sonali Phogat: सोनाली फोगटची तब्येत बिघडली अन् त्या दोघींनी कलटी मारली; कोण होत्या, नेमके संबंध काय?
गोवा- सोनाली फोगाट खून प्रकरणी मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार सोमवारी हणजूण पोलिसांनी कर्लीस बार टाळे ठोकले. याच क्लबमध्ये सोनाली फोगाट हिला जबरदस्तीने अंमली पदार्थ पाजला होते. सोनालीच्या मृत्यूनंतर तपासात बारच्या बाथरूममध्ये मेटाफेथामाईन ड्रग्ज सापडले होते. त्यावेळी पोलिसांनी बारचा पहिला मजला व बाथरूम सील केले होते. मात्र, काल संपूर्ण बार सील करण्यात आला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हणजूण पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असताना आता सोनालीच्या मृत्यूचा कट हरयाणात रचल्याची माहिती समोर येत आहे. सोनालीचा तिचा स्वीय सहाय्यक तथा सोनालीच्या खुनाचा मुख्य संशयित सुधीर सांगवान व मित्र सुखविंदर सिंग यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
पीए सांगवानचा मित्र सुखविंदर सिंग हा सोनालीचे वास्तव्य असणाऱ्या हॉटेलमध्ये आणखी दोन युवतींना घेऊन आला होता. नंतर त्या दोघी कर्लीस बारमध्येही होत्या. बारमध्ये सोनालीची तब्बेत बिघडली त्यानंतर त्या तिथून गायब झाल्या. पोलीस त्या दोघी कोण हत्या? त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? यासाठी त्यांच्या मागावर आहे.
अहवाल हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना देऊ-
अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात तपासकामाचा कृती अहवाल हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना सादर करू, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार का? या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोवा पोलिसांच्या तपासकामावर माझा पूर्ण विश्वास आहे.
गरज पडली तरच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल. गोवा पोलिसांकडून आतापर्यंत जे तपासकाम झालेले आहे त्याचा कृती अहवाल हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मी सादर करणार आहे. त्या संदर्भात पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याशी मी चर्चा केली आहे आणि सायंकाळपर्यंत कृती अहवाल सादर करीन.