आमचा लढा लोकशाही वाचविण्यासाठी; गोवा प्रदेश युवक काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 08:47 AM2023-04-03T08:47:24+5:302023-04-03T08:47:51+5:30

प्रदेश युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्रादेव अन्य सदस्यदेखील या मोर्चात सहभागी झाले होते.

our fight to save democracy protest march by goa pradesh youth congress | आमचा लढा लोकशाही वाचविण्यासाठी; गोवा प्रदेश युवक काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा

आमचा लढा लोकशाही वाचविण्यासाठी; गोवा प्रदेश युवक काँग्रेसतर्फे निषेध मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: भारतीय युवक काँग्रेसलोकशाही वाचविण्यासाठी लढा लढत आहे. ही लढाई जिंकेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे प्रतिपादन भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी येथे केले. प्रदेश युवक काँग्रेसने म्हापसा येथे आयोजित केलेल्या 'लोकशाही वाचवा' या निषेध मोर्चात ते सहभागी झाले होते. मोर्चात नागरिकांचा मोठा सहभाग होता. प्रदेश युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्रादेव अन्य सदस्यदेखील या मोर्चात सहभागी झाले होते.

श्रीनिवास पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकार हे एका उद्योजकाला वाचविण्यासाठी लोकशाहीची हत्या करत आहे. त्यामुळेच आपल्याला त्रासदायक ठरणारे प्रश्न विरोधक सातत्याने विचारत असल्याने त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधी यांनी या प्रश्नावर लोकसभेत प्रश्न विचारताच त्यांच्याविरोधातील प्रलंबित प्रकरण पुन्हा ताजे करण्यात आले. न्यायाधीश बदलण्यात आले. प्रकरणाचा निर्णय देताना शिक्षादेखील सुनावण्यात आली. वेगाने त्यांना अपात्रदेखील करण्यात आले. हे सर्व काँग्रेसच्या लोकसभेतील नेत्याला गप्प करण्याच्या उद्देशानेच करण्यात आले.

गोवा प्रदेश युथ कॉंग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्रादे म्हणाले की, आम्ही हे लक्षात घेतली पाहिजे की प्रश्न विचारल्यास तुम्हाला थेट लक्ष्य केले जाईल, असा संदेश भाजप सरकारच्या कृतीतून स्पष्ट दिसत आहे. जिल्हा उपाध्यक्ष विल्मा फर्नांडिस, उत्तर गोवा युथ कॉंग्रेस अध्यक्ष रिनाल्डो रोझारियो, जिल्हा उपाध्यक्ष विल्मा फर्नांडिस, एराज मुल्ला, नितीन पाटकर यांनीही विचार मांडले. या मोर्चामध्ये प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष तुलियो डिसोझा, सरचिटणीस विजय भिके, प्रदीप नाईक, अर्चित नाईक, वरद म्हार्दोळकर, प्रसारमाध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, एल्विस गोम्स, विकास प्रभुदेसाई, अमन लोटलीकर सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पाटकर यांनी भाजपवर टीका केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 
 

Web Title: our fight to save democracy protest march by goa pradesh youth congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.