शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीला उरले आठ दिवस; प्रचाराची रंगत वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 1:34 PM

उमेदवारांकडून आरोप-प्रत्यारोप; आयोगाकडेही तक्रारी 

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघाची विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली असून या पोटनिवडणुकीत आता रंग भरु लागला आहे. घरोघरी गाठीभेटींसाठी उमेदवारांची धावपळ चालली आहे. तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोप, एकमेकांविरुध्द तक्रारीही केल्या जात आहेत. येत्या १९ रोजी ही पोटनिवडणूक होत आहे. प्रचारासाठी जवळपास आठवड्याभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारांची धावपळ उडाली आहे. भाजपा उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर सायंकाळी उशिरापर्यत प्रचारकार्यात दिसत आहेत. तर सकाळी ९ नंतर प्रचारकामाला सुरुवात करणारे काँग्रेसी उमेदवार बाबुश मोन्सेरात आता दोन तास आधीच बाहेर पडू लागले आहेत. ‘गोसुमं’चे सुभाष वेलिंगकर, ‘आप’चे वाल्मिकी नायक यांनीही प्रचाराची गती वाढवली आहे.पर्रीकरांची पुण्याई कामी येणार? भाजपाने पर्रीकर यांच्या जागी माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांना रिंगणात उतरवले आहे. पर्रीकर यांच्या पश्चात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून संपूर्ण गोव्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. पर्रीकरांची पुण्याई भाजपच्या कामी येते की यावेळी काँग्रेस बाजी मारतो, हे पहावे लागेल. काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी स्वत:च्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्याचे टाळल्याप्रकरणी भाजपने गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हे बंधनकारक असून या प्रकरणात अवमान याचिका सादर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांना सादर केलेल्या या तक्रारीत असे म्हटले आहे की, मोन्सेरात व काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या या सक्तीच्या तरतुदीचा भंग केलेला आहे आणि तो कोर्टाचाही अवमान ठरतो. आयोगाने उमेदवाराला याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तेंडुलकर यांनी हेही निदर्शनास आणले आहे की, बाबुश यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुध्द भादंसंच्या विविध कलमांखाली तसेच, ‘पोस्को’, आयकर कायदा तसेच सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल असल्याचे स्पष्टपणे म्हटलेले आहे.दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस सदानंद तानावडे म्हणाले की, ‘कुणाल यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतलेले असून उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले जातील, असे आश्वासन दिलेले आहे.’ दरम्यान, भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी या प्रकरणात प्रसंगी अवमान याचिकाही सादर करु, असा इशारा दिला आहे.दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते सिध्दनाथ बुयांव यांनी भाजपचे माजी आमदार दामू नाईक यांनी बाबुश यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याचा समाचार घेताना पर्रीकर पणजीत निवडणूक लढवायचे, तेव्हा भाजपा बाबुशचा पाठिंबा कोणत्या तोंडाने घ्यायची? असा सवाल केला आहे. येत्या २३ नंतर राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल त्यानंतर दामू नाईक यांच्यावर खटले भरु, असा इशारा दिला आहे.  

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक