शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उसगाव पंचायत क्षेत्रात दोन अपघातात एक ठार ,दोन जखमी 

By आप्पा बुवा | Updated: June 20, 2024 19:08 IST

अपघाता नंतर ट्रक चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 फोंडा -  उसगाव पंचायत क्षेत्रात गुरुवारी झालेल्या दोन अपघातामध्ये एक जण ठार तर दोघे जण जखमी होण्याची घटना घडली आहे. एक अपघात हा हिट अँड रन प्रकरण आहे.

 सविस्तर वृत्तानुसार दुपारी दीडच्या दरम्यान उसगाव नेसले फॅक्टरी जवळ असलेल्या खुरसाकडे या जागी भीषण अपघात झाला. ट्रक क्रमांक (आरजे -  27 - जीबी- 2124)हा भरधाव वेगात मोलेच्या दिशेने निघाला होता. अपघातात मृत्युमुखी झालेला स्थानिक रहिवासी आनंद धर्मा नाईक( वय 57 )हे जवळच्या दुकानात काही खरेदी करण्यासाठी आले होते. खरेदी करून निघत असताना भरधाव मालवाहू ट्रकने त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की मृत झालेल्या नाईक याचे शिर सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आढळून आले. खुरसाकडे जिथे अपघात झाला तिथे सुद्धा त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता. सुरुवातीला त्याची ओळख पटवणे सुद्धा कठीण झाले होते.

 अपघाता नंतर ट्रक चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगात पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ट्रक राष्ट्रीय महामार्गावर पकडला. हिट अँड रन केसच्या प्रकरणी ड्रायव्हर धनानाथ हिरानात जोगी (वय 66 ,राहणार उदयपूर राजस्थान )याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताबद्दल जास्त माहिती देताना तो म्हणाला की  उसगाव येथे त्यावेळी मुसळधार पाऊस कोसळत होता .सदर इसम ट्रकच्या खाली आला आहे हे त्याला माहीतच नव्हते. त्यामुळेच आहे त्याच वेगात ट्रक पुढे गेला. अपघात झाल्यानंतर त्याचे शीर ट्रकलाच अडकून राहिले जे नंतर एमआरएफ कंपनी समोर रस्त्यावर पडले होते.

 त्याच ठिकाणी झालेल्या दुसऱ्या अन्य एका अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्तानुसार एक मालवाहू टेम्पो चुकीच्या दिशेने आत शिरला. यावेळी उजगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वरांना अचानक वळलेल्या टेम्पो चां अंदाज आला नाही. दुचाकी वरील त्यांचा ताबा गेला व त्यांची दुचाकी थेट टेम्पो चाकाच्या खाली आली.या अपघातात  दोन्ही दुचाकीस्वार  किरकोळ जखमी झाले आहेत. फोंडा पोलीसानी दोन्ही अपघाताचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.  

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू