गोव्यात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 21:00 IST2019-05-18T20:59:41+5:302019-05-18T21:00:48+5:30

गोव्यातील शिरगाव येथे रेल्वेच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाला.

 One dies in Goa | गोव्यात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

गोव्यात रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

मडगाव - गोव्यातील शिरगाव येथे रेल्वेच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू झाला. काल शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. मयताची ओळख पटली आहे. जितेंद्र राघोबा कळंगुटकर (39) असे मयताचे नाव असून तो पोब्रावाडो येथील रहिवाशी असल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांनी दिली. त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. शुक्रवारी सांयकाळी सव्वा पाच वाजता रेल्वे रुळावरुन चालत जाताना त्याला काहीजणांनी बघितले होते. धावत्या रेल्वेच्या खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबधित ठिकाणी जाउन पंचनामा केला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी या प्रकरणाची पोलीस दफ्तरी नोंद केली आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी.बी. मडकईकर पुढील तपास करीत आहेत.
 

Web Title:  One dies in Goa