शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान प्रकरणी हायकोर्टाची पोलिसांना नोटिस

By admin | Published: July 01, 2016 9:16 PM

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर गोव्यात १.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुझान हिने येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात

- १.८७ कोटी रुपये फसवणुकीचे प्रकरण पणजी : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानवर गोव्यात १.८७ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुझान हिने येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्यास आव्हान दिल्याने कोर्टाने पोलिसांना नोटिस बजावून दोन आठवड्यांच्या आत उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. स्वत: डिझायनर अससेल्या सुझानने आपण वास्तुविशारद असल्याचे सांगून कंत्राट मिळविल्याचे पणजी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले होते. २0 जून रोजी या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला होता. एम्गी प्रोप्रायटर या खासगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मुधित गुप्ता यांनी तक्रार दिलेली आहे. या प्रकरणी सुझान हिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांनी समन्सही बजावले होते. सुझानने स्वत: वास्तुविशारद असल्याचे भासवून कंपनीच्या एका कंत्राटासाठी अर्ज केला व ते मिळविले. उत्तर गोव्यातील तिसवाडी तालुक्यात शिरदोण येथे कंपनीचा नायरा कॉम्प्रेक्स उभारण्याचे हे कंत्राट होते. त्यासाठी तिला १.८७ कोटी रुपये कंपनीकडून दिले होते. प्रत्यक्षात तिच्याकडून झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे ती व्यावसायिक वास्तुविशारद नसल्याचा कंपनीला संशय आला. कंपनीने तिच्याकडे काउन्सिल आॅफ आर्किटेक्चरकडून तिला मिळालेला नोंदणी क्रमांक विचारला तेव्हा तिने तो देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनीचा संशय बळावल्यामुळे पोलिसांत तक्रार नोंदविली.