शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रावळीची झोळी रिकामीच...

By admin | Updated: June 25, 2015 01:06 IST

सरकारने मोठा गाजावाजा करून सांगे तालुक्यातील नेत्रावळी गाव सर्वंकष विकासासाठी दत्तक घेतला. शेतकऱ्यांना हरित, धवल क्रांतीची स्वप्ने दाखवली; परंतु सर्व कामे

सरकारने मोठा गाजावाजा करून सांगे तालुक्यातील नेत्रावळी गाव सर्वंकष विकासासाठी दत्तक घेतला. शेतकऱ्यांना हरित, धवल क्रांतीची स्वप्ने दाखवली; परंतु सर्व कामे लालफितीत अडकल्याने स्थानिकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. सरकारवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मात्र, त्यांची बिलेही फेडलेली नाहीत. दहा कोटी रुपयांची तरतूद असताना अवघे १0 ते १५ लाख रुपये खर्च करून उर्वरित निधी विनावापर ठेवला आहे.सरकारच्या या अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. २0१२-१३ च्या अर्थसंकल्पात पर्रीकर सरकारने नेत्रावळीच्या सर्वांगीण विकासासाठी वरील निधीची तरतूद केली. नियोजन व सांख्यिकी खात्याने सुरुवातीला नेटाने काम हाती घेतले. कृषी तसेच दूध उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले. ५४0 महिलांचा समावेश असलेले २४ महिला स्वयंसाहाय्य गट स्थापन करण्यात आले. शेतकऱ्यांसाठी कृषी संशोधन केंद्राच्या एला फार्मची मदत घेण्यात आली. गावात कोणकोणत्या प्रकारची पिके घेता येतील याचा अभ्यास करण्यासाठी मातीचे १२00 नमुने घेण्यात आले. सुमारे १ लाख चौरस मीटर जमिनीत पशुचारा उगविण्यात आला. शेतकऱ्यांनी दुभती जनावरे खरेदी करून गावातील दूध उत्पादन दिवशी १५00 लिटरवरून ३000 लिटर इतके दुपटीने वाढविले; परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे सहा महिन्यांतच या सर्व गोष्टींवर पाणी फिरले. आज गावातील दूध उत्पादनही घटले असून शेतकरीही नाखुश आहेत. सरकारच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने गुंतवणूक केली. सुमारे १ कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. पशुचारा खरेदी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; परंतु ते पाळले नाही. शेतकऱ्यांची बिले सादर होऊनही गेली दोन वर्षे त्यांच्या हातात पैदेखील मिळालेली नाही. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिले अडविली आणि एकूणच सर्व व्यवहार लालफितीत अडकल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला असून शेतकऱ्यांची स्वप्नेही धुळीस मिळाली आहेत. या सर्वावर कहर म्हणजे सरकारने ही योजना नियोजन सांख्यिकी खात्याकडून काढून घेऊन कृषी खात्याकडे सोपविली. कृषी खाते या योजनेला मुळीच न्याय देऊ शकलेले नाही.