शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम कुटुंबाने केले मंदिरासाठी भूदान!

By admin | Updated: June 23, 2014 01:37 IST

धार्मिक एकोप्याचा आदर्श : दातृत्वातून भक्तिभावाची प्रचीती

सुशांत कुंकळयेकर-मडगाव  - गोव्यातील एका मुस्लिम कुटुंबाने स्वमालकीची जमीन सिद्धिविनायक मंदिराला दान करून धार्मिक एकोप्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात २00४ साली एक आगळा आदर्श घालून दिला होता. कुंकळ्ळी या एका छोट्याशा गावातील शेख कुटुंबीयांच्या हृदयात या भूदानाबद्दल दातृत्वापेक्षा भक्तिभावच अधिक आहे. कुंकळ्ळी गाव पणजीपासून ५0 कि.मी. अंतरावर असून, पायराबांद येथे हे सिद्धिविनायक मंदिर आहे. सुरुवातीला हे मंदिर लहान होते. मात्र, ज्या वेळी या मंदिराचा विस्तार हाती घेण्यात आला, त्या वेळी कुंकळ्ळी येथील शेख अब्दुल रेहमान यांच्या मालकीची जागा मंदिर समितीने मागितली. क्षणाचाही विलंब न करता रेहमान यांनी ही मागणी मान्य केली, असे मंदिर समितीचे माजी अध्यक्ष शिवदास नाईक यांनी सांगितले. कुंकळ्ळी गाव पूर्वापार धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध असून, पोर्तुगीज काळात बाटाबाटीच्या वेळी ख्रिस्ती झालेल्या या गावातील लोक अजूनही आपले मूळ विसरलेले नाहीत. यामुळेच गावाची देवी असलेल्या शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणच्या जत्रोत्सवाला हिंदंूप्रमाणेच ख्रिश्चनही मोठ्या प्रमाणात जातात. या देवीच्या छत्रोत्सवावेळी जी पालखी निघते त्या पालखीला खांदा देण्याचा मान येथील मूळ हिंदू; पण नंतर ख्रिस्ती झालेल्या बांधवांना आहे. गावातील ख्रिस्ती बांधव ‘देवीच्या मागणी’चा मोठ्या अभिमानाने उल्लेख करतात. वास्तविक हे शेख कुटुंब फारसे धनिक नाही. शेख अब्दुल रेहमान यांचा प्रवासी वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. रेहमान यांनी जमीन मंदिरासाठी दान देण्याचे ठरविल्यानंतर त्याबाबत मुलांनाही सांगितले होते. त्यांच्या निधनानंतर मुलांनीही वडिलांच्या इच्छेला मान देऊन जमीन मंदिर समितीच्या हवाली केली. रेहमान यांची पत्नी आएशाबी, मुले शेख शरफुद्दिन, शेख अन्वर व शेख अब्दुल रजाक यांनी त्यांच्या मालकीची २00 चौ. मी. जमीन रेहमान यांच्या स्मरणार्थ दान केल्याची नोंद मंदिरात आहे.