मिरामार किनार्‍यावर २४ पर्यटकांना दंड, मास्क न वापरता फिरल्याने महापालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 15:44 IST2020-09-16T15:43:55+5:302020-09-16T15:44:49+5:30

बेशिस्त वागणाऱ्या पर्यटकांविरुद्ध मोहीम चालूच राहणार आहे. कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सार्वजनिक ठिकाणी फिरताना एकमेकांमध्ये सहा फुटांची शारीरिक दूरी तसेच तोंडावर मास्क बांधणे बंधनकारक आहे.

Municipal Corporation takes action against 24 tourists for walking on Miramar beach without wearing masks | मिरामार किनार्‍यावर २४ पर्यटकांना दंड, मास्क न वापरता फिरल्याने महापालिकेची कारवाई

मिरामार किनार्‍यावर २४ पर्यटकांना दंड, मास्क न वापरता फिरल्याने महापालिकेची कारवाई

पणजी -  मास्क न वापरता फिरणाऱ्या पर्यटकांना महापालिका निरीक्षकांनी पुन्हा एकदा दणका दिला आहे. मिरामार किनार्‍यावर २४ पर्यटकांना दंड ठोठावण्यात आला.

महापौर उदय मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बेशिस्त वागणाऱ्या पर्यटकांविरुद्ध मोहीम चालूच राहणार आहे. कोविड महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सार्वजनिक ठिकाणी फिरताना एकमेकांमध्ये सहा फुटांची शारीरिक दूरी तसेच तोंडावर मास्क बांधणे बंधनकारक आहे. मास्क परिधान न केल्यास शंभर रुपये दंड ठोठावला जातो. रविवारी चर्च स्क्वेअर मध्ये 15 पर्यटकांना असाच दंड ठोठावण्यात आला होता. मिरामार किनारा, दोनापॉल जेटी तसेच पणजी परिसरातील अन्य पर्यटन स्थळांवर महापालिका कारवाई चालूच ठेवणार आहे. 

Web Title: Municipal Corporation takes action against 24 tourists for walking on Miramar beach without wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.