शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

‘मुसळ’धारा सुरूच

By admin | Updated: June 18, 2014 07:25 IST

पणजी : उत्तर व दक्षिण गोव्यात जोरदार पावसाचा मारा सुरूच असून गेल्या २४ तासांत सुमारे ४ इंच वृष्टी झाली आहे.

पणजी : उत्तर व दक्षिण गोव्यात जोरदार पावसाचा मारा सुरूच असून गेल्या २४ तासांत सुमारे ४ इंच वृष्टी झाली आहे. राजधानी पणजीसह राज्यातील सर्व भागांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत बराच पाऊस पडला. राज्यातील प्रमुख शहरांमधील अनेक रस्ते मंगळवारी सकाळी पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते. सोमवारी सायंकाळी पावसाचा तडाखा सुरू झाला होता. त्यानंतर रात्रभर पाऊस पडला. मंगळवारी दुपारपर्यंत वृष्टी झाली. दि. १ जूनपासून आतापर्यंत मोसमी पाऊस ३५६.४ मिलीमीटर झाला आहे. म्हापसा भागात ६६.० मिलीमीटर, पेडणेत ९०.४ मिलीमीटर, फोंडा १०७.५ मिलीमीटर, जुने गोवे भागात ७२.९ मिलीमीटर, साखळीत ८८.४, वाळपईत ७५.३, काणकोण भागात १४१.६, तर दाबोळी भागात ९७.२ मिलीमीटर वृष्टी झाल्याची नोंद वेधशाळेने आपल्या त्या त्या भागातील केंद्रांद्वारे केली आहे. राज्यात मान्सून आता पूर्णपणे स्थिरावल्याचा अनुभव लोकांना येत आहे. जोराचा पाऊस आल्याने अनेक ठिकाणी नाले भरून वाहू लागले आहेत. राजधानी पणजीत तर पावसाचे पाणी लवकर रस्ते व्यापून टाकत आहे. सत्तरी, सांगे, काणकोण, केपे, पेडणे या तालुक्यांतही मंगळवारी जोरदार पाऊस पडला. (खास प्रतिनिधी)