मनोहर पर्रिकर यांनी ट्विटरवरून मानले हितचिंतकांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 18:07 IST2018-02-22T18:05:58+5:302018-02-22T18:07:07+5:30
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारपणातून सावरले असून, गुरुवारीत त्यांनी गोव्याच्या विधानसभेत उपस्थित राहून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजारपणातून सावरलेले पर्रिकर विधानसभेत आल्यावर सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले.

मनोहर पर्रिकर यांनी ट्विटरवरून मानले हितचिंतकांचे आभार
पणजी - गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारपणातून सावरले असून, गुरुवारीत त्यांनी गोव्याच्या विधानसभेत उपस्थित राहून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आजारपणातून सावरलेले पर्रिकर विधानसभेत आल्यावर सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. त्याआधी पर्रिकर यांनी आजारपणात प्रकृतीच्या सुधारणेसाठी सदिच्छा देणाऱ्या हितचिंतकांचे ट्विटरवरून आभार मानले.
"आजारी पडल्यानंतर माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा देणाऱ्या, तसेच मंदिर, चर्च आणि मशिदींमधून प्रार्थना करणाऱ्या सर्व हितचिंकांचे मी आभार मानतो. मी तुमच्या प्रेमामुळे भारावून गेलो आहे. तुमच्या सदिच्छा,शुभेच्छा आणि प्रार्थनांमुळेच आजारपणातून लवकरात लवकर सावरून गोव्यात परतणे मला शक्य झाले आहे." असे पर्रिकर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज कोणत्याही परिस्थीतीत स्वत:च राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केल्याने ते गोव्याला यायला निघाले. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विशेष विमानाने मनोहर पर्रिकर गोव्यात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री पर्रिकर गेल्या आठ दिवसापासून मुंबईच्या लिलावती इस्पितळात पचनक्रियेतील बिघाडावर उपचार घेत आहेत. विधानसभेच्या सोमवार पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला पर्रिकर उपस्थित राहू शकले नव्हते. पर्रिकर दुपारच्या विमानाने गोव्यात उतरत असून दुपारी अडीच वाजता विधानसभेत दाखल होऊन ते अर्थसंकल्प सादर करतील. त्यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची आवश्यकता नसून आजार गंभीर असला तरी त्यांनी मुंबईतच उपचार घ्यावेत, असा सल्ला त्यांना तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करुन ते तातडीने मुंबईला परततील अशी शक्यता आहे.