शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

बाल दिनाच्या कार्यक्रमात मनोहर पर्रीकरांनी सांगितला अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 10:12 AM

आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी एका बालदिनाच्या कार्यक्रमात बोलताना आपला तरुण वयातील अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव सांगितला.

ठळक मुद्देअॅडल्ट चित्रपट पाहताना आलेला एक गंमतीशीर अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला.चित्रपटगृहात इंटरवल झाल्यानंतर लाईटस ऑन झाल्या, त्यावेळी माझ्या बाजूच्या सीटवर माझा शेजारी बसला असल्याचे माझ्या लक्षात आले.

पणजी - आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी एका बालदिनाच्या कार्यक्रमात बोलताना आपला तरुण वयातील अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव सांगितला.  न्यूज 18 नं दिलेल्या वृत्तानुसार, शाळेतल्या मुलांशी संवाद साधताना एका विद्यार्थ्याने पर्रीकरांना तरुण वयात तुम्ही कोणते चित्रपट पाहायचा असा प्रश्न विचारला. त्यावर पर्रीकरांनी आम्ही फक्त चित्रपट पाहायचो नाही तर त्यावेळचे अॅडल्ट चित्रपटसुद्धा पाहायचे असे उत्तर दिले. 

अॅडल्ट चित्रपट पाहताना आलेला एक गंमतीशीर अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. एकदा मी आणि माझा भाऊ त्यावेळचा प्रचंड गाजलेला अॅडल्ट चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. मी त्यावेळी तरुण होतो. चित्रपटगृहात इंटरवल झाल्यानंतर लाईट्स ऑन झाल्या. त्यावेळी माझ्या बाजूच्या सीटवर माझा शेजारी बसला असल्याचे माझ्या लक्षात आले. हा शेजारी माझ्या आईबरोबर नेहमी बोलायचा. त्याला पाहिल्यानंतर घरी गेल्यावर आता आपली काही खैर नाही असे मला वाटले. 

मी आणि माझा भाऊ अवधुत आम्ही दोघांनी चित्रपट अर्ध्यावर सोडून चित्रपटगृहातून पळ काढला. घरी परतत असताना दोघांनी परिस्थिती कशी हाताळायची त्याचा प्लान आखला होता. आईला शेजा-याकडून समजले तर आणखी ओरडा किंवा मार पडेल म्हणून मनोहर पर्रिकरांनी घरी परतल्यानंतर लगेचच आईकडे चित्रपट पाहायला गेल्याची कबुली दिली.  

मी आईला सांगितले आम्ही दोघे चित्रपटाला गेलो होतो. पण त्या थिएटरला घाणेरडा चित्रपट लागला होता. आम्हाला त्या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणून आम्ही चित्रपट अर्ध्यावर सोडून बाहेर पडलो. आपले शेजारी सुद्धा तिथे दिसले असे त्यांनी आईला सांगितले. दुस-याच दिवशी शेजा-यांनी अतिउत्साहाने माझ्या आईला बोलवले व  अवधुत आणि मनोहर अॅडल्ट चित्रपट पाहायला गेले होते असे सांगितले. त्यावर आईने दोघे कुठल्या चित्रपटाला गेले होते ते मला माहित आहे. पण तुम्ही त्या चित्रपटाला का गेला होता ? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर शेजारी गप्प झाले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाcinemaसिनेमा