शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मी लवकरच तुमच्यात परतेन, मनोहर पर्रिकरांचा कार्यकर्त्यांसाठी भावनिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 9:59 PM

पर्रिकर जेव्हा गोव्यात परततील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मी पुन्हा गोव्यात येईन, असे शहा म्हणाले.

पणजी : माझ्यावरील उपचार यशस्वी ठरत आहेत. येत्या काही आठवडयांत मी लोकांमध्ये पुन्हा येऊ शकेन, असा संदेश गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना पाठवला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात रविवारी सायंकाळी गोवा प्रदेश भाजपचे बुथस्तरीय कार्यकर्ता संमेलन पार पडले. शहा यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी शहा यांच्या उपस्थितीतच पर्रिकर यांचा व्हिडिओ संदेश सभागृहातील स्क्रीनवर दाखवला गेला. आपण भाजपच्या बूथस्तरीय संमेलनाला शुभेच्छा देत आहे. अमित शहा यांचे मी स्वागत करतो. मी गेले दोन महिने उपचारांसाठी विदेशात आहे. त्यामुळे मी तुम्हा लोकांना भेटू शकलो नाही. आपल्यावरील उपचार चांगल्या प्रकारे यशस्वी होत आहेत. येत्या काही आठवडय़ांत मी गोव्यातील लोकांमध्ये परत येऊ शकेन, असे पर्रिकर आपल्या संदेशात म्हणाले. अमित शहा यांनी आपल्या भाषणातही मनोहर पर्रिकर यांचा उल्लेख केला. पर्रिकर यांच्याशी आपण नुकतेच फोनवर बोललो. पर्रिकर यांना मी तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले. पर्रिकर यांनी मात्र मला कर्नाटकमध्ये काय होणार असे विचारले. पर्रिकर यांनी असे विचारले कारण ते पूर्णपणो भाजपशी जोडले गेले आहेत व ते भाजपचाच विचार करतात असे शहा म्हणाले. पर्रिकर जेव्हा गोव्यात परततील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मी पुन्हा गोव्यात येईन, असे शहा म्हणाले. मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो तेव्हाच र्पीकर हे केंद्रात संरक्षण मंत्री होते व त्यांचे काम पाहण्याची मला संधी मिळाली, असे शहा म्हणाले. त्यांचे गोव्यात मोठे स्वागत केले जाईल. त्यासाठी मोठे संमेलन आयोजित करू. मी निश्चितच त्यावेळी परत येईन, असे शहा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा