शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

बहुमताने विजय, हेच विरोधकांना ठोस प्रत्युत्तर - श्रीपाद नाईक

By समीर नाईक | Updated: April 11, 2024 15:02 IST

Lok Sabha Elections 2024: श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी ताळगाव मतदारसंघाचा दौरा केला.

पणजी: ताळगाव मतदार संघाने आतापर्यंत बऱ्यापैकी विकास केला आहे. त्यांना आवश्यक गोष्टी खासदार असताना यापूर्वी मी दिल्या आहेत, यापुढे देखील जे आवश्यक आहे, ते त्यांना निश्चित मिळणार आहे. भविष्यात जर निवडून आलो तर तळगावमधील इतर आवश्यक गोष्टी आहेत, त्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी दिले.

श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी ताळगाव मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जेनिफर मोंसेरात, दामू नाईक, महापौर रोहित मोंसेरात, जिल्हा पंचायत सदस्य अंजली नाईक व इतर पंच सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी श्रीपाद नाईक यांनी सर्व पंच सदस्य आणि नगरसेवकांशी वार्तालाप केला. व समस्या जाणून घेतल्या. 

मोंसेरात कुटुंबीयांचा मला नेहमीच पाठिंबा मिळालेला आहे. आणि यापुढेही त्यांचा पाठिंबा मिळणार आहे, याची मला खात्री आहे. लोकसभेसाठी मला तिकीट मिळाल्याने विरोधकांचा आत्मविश्वास डगमगला आहे, यातून ते केवळ लोकांची दिशाभूल करत आहेत. जे नुकतेच राजकारणात आले ते विचारतात की मी गेल्या २५ वर्षात काय केले? ते नुकतेच आल्याने त्यांना माहीत देखील नसणार हे मी समजू शकतो. आम्ही जी कामे २५ वर्षात केली ती लोकांनी पहिली आहेत, त्यामुळे लोकांची दिशाभूल करणे विरोधकांनी टाळावे, असे नाईक यांनी सांगितले.

विरोधकांना ठोस प्रत्युत्तर म्हणजे माझा बहुमताने विजय. यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे  काम केले पाहिजे. आमच्या सरकारने केलेली  विकासकामे हाच आमच्यासाठी या लढाईत प्रमुख अस्त्र असणार आहे. भाजप सरकारने केवळ समजाचाच विकास केला नाही, तर लोकांचाही विकास केला आहे. हे लोकांपर्यत पोहचणे आवश्यक आहे. माझा देश, माझे राज्य, माझे गाव हीच भावना मनात ठेऊन मी देखील आतापर्यंत काम केले आहे, याच कामांमुळे मी आज मान वर करून लोकांकडे जात आहे, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.

विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या श्रीपाद भाऊ यांनी यावेळी ताळगाव येथील सेंट मायकल चर्चाला भेट देत आशीर्वाद घेतला, व नंतर त्यांनी शापोल येथील मार्केटला भेट देत विक्रेत्यांशी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनतर त्यांनी ओडशेल येथील श्री लक्ष्मी देवस्थानला भेट देत देवीचे दर्शन घेतले, व तेथील देवस्थान समितीच्या सदस्यांशी वार्तालाप केला.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४