म. गांधीचे स्वप्न सत्यात आणले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जयंती दिनी वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:02 IST2025-10-03T13:01:32+5:302025-10-03T13:02:15+5:30
म. गांधी जयंतीनिमित्त जुने गोवा येथे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित कार्यक्रम मुख्यमंत्री बोलत होते.

म. गांधीचे स्वप्न सत्यात आणले: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; जयंती दिनी वाहिली आदरांजली
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्वच्छता ही सेवा उपक्रम देशभर राबून सरकारने महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार केले आहे. राज्य सरकारही स्वच्छ गोवा सुंदर गोवा करुन गांधीजींच्या स्वप्न सत्यात आणले आहे. आम्हाला गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेवर काम केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
म. गांधी जयंतीनिमित्त जुने गोवा येथे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित कार्यक्रम मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, मुख्य सचिव व्ही. कांदावेळू आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, महात्मा गांधी यांचा विचार होता अंतोदय, सर्वोदय, ग्रामोदय. त्यानुसार भाजप सरकार काम करत आहेत. तसेच नशा मुक्त भारतासाठी सरकारकडून मोठे उपक्रम आयोजित केले जात आहेत. यासाठी आता युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.
आजचा युवा सक्षम व्हावा यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहेत. तसेच अनेक केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनांचा आम्ही जनतेला लाभ मिळवू देत आहोत. आता सुशिक्षित भारत तंदरुस्त भारत अशा प्रकारच्या योजना राबवून आम्ही देशातील युवकांना फक्त शैक्षणिकच नाही तर निरोगी व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
सेवा पंधरवड्या उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेबर ते २ ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून देशभर साजरा केला जातो. यात आम्ही विविध उपक्रम केले जातात. राज्यात सर्व मंत्री आमदारांनी आपआपल्या मतदारसंघात असे जनतेसाठी विविध उपक्रम करुन लोकांना चांगली सेवा दिला आहे. सर्वत्र स्वच्छता मोहीम केली. स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांनी लोकांना विविध योजनांची माहिती दिले.