शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना लॉटरी

By admin | Updated: June 24, 2015 01:25 IST

पणजी : राज्य सरकारच्या विविध खात्यांशी संबंधित कंत्राटी कामगार, शासकीय महामंडळ तसेच पालिका, ग्रामपंचायती व अन्य स्वायत्त संस्थांमधील कंत्राटी

पणजी : राज्य सरकारच्या विविध खात्यांशी संबंधित कंत्राटी कामगार, शासकीय महामंडळ तसेच पालिका, ग्रामपंचायती व अन्य स्वायत्त संस्थांमधील कंत्राटी कर्मचारी यांच्यासाठी सरकारने किमान वेतनात वाढ केली आहे. २२१ रुपयांवरून ३२३ रुपयांचे किमान वेतन निश्चित करणारा आदेश सरकारच्या मजूर आयुक्त फातिमा रॉड्रिग्स यांनी मंगळवारी जारी केला. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने १ जूनपासून लागू होत आहे. औद्योगिक कामगारांना मात्र हाआदेश लागू होत नाही.सरकारच्या विविध खात्यांमध्ये, महामंडळे व मंडळांसारख्या शासकीय संस्थांमध्ये आणि स्वायत्त संस्थांमध्येही अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यापैकी बहुतेकजण रोजंदारी पद्धतीवर आहेत. तसेच अनेकजण सरकारसाठी कंत्राटदाराच्या हाताखाली काम करतात. या सर्वांसाठी २२१ रुपयांचे किमान वेतन होते. ते आता सरकारने सुमारे ५० टक्क्यांनी वाढवले आहे. काही हजार कामगारांना याचा लाभ होईल. मजूर आयुक्त रॉड्रिग्स यांनी मंगळवारीच याबाबतच्या आदेशावर सही केली.दरम्यान, राज्यातील विविध उद्योगांमध्ये जे काम करतात, त्यांच्यासाठी २८४ रुपयांचे किमान वेतन आहे. ते वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. त्यासाठीच्या मसुदा अधिसूचनेवर यापूर्वी सरकारने लोकांच्या सूचना व आक्षेप मागविले आहेत. त्यानुसार सूचना येत आहेत. अजून सरकारने त्याविषयी अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ३२३ रुपयांचा वेतनवाढीचा नवा निर्णय उद्योगांमधील कामगारांना लागू होत नाही. पणजी महापालिकेच्या कामगारांना मात्र किमान वेतनाचा हा आदेश लागू होईल. महापालिका कामगारांना मात्र ३२३ रुपयांचे किमान वेतन मान्य नाही. ते ४०९ रुपयांचे किमान वेतन मागत आहेत. सरकारने यापूर्वी तसा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे; पण महापौर शुभम चोडणकर यांच्या मते, सरकारने तसा निर्णय घेतल्याचा एकही कागदोपत्री पुरावा नाही. (खास प्रतिनिधी)