शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा लोबोंनी वाचला पर्रीकरांसमोर पाढा

By admin | Updated: February 27, 2015 02:14 IST

पणजी : बेकायदा डान्स बार प्रकरणात सरकारवर हल्लाबोल करणारे आमदार मायकल लोबो यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

पणजी : बेकायदा डान्स बार प्रकरणात सरकारवर हल्लाबोल करणारे आमदार मायकल लोबो यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन राज्य प्रशासनाचे अपयश तसेच पोलिसांची अकार्यक्षमता याबाबत पाढाच वाचला. पार्सेकर सरकारातील मंत्रीही स्वत:च्या मतदारसंघापुरतीच कामे करतात, इतर मतदारसंघांकडे त्यांचे लक्ष नाही, अशी तक्रारही लोबो यांनी पर्रीकरांकडे केली. प्राप्त माहितीनुसार, या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. कळंगुटमध्ये डान्स बारसाठी केलेली बेकायदा बांधकामे, किनारपट्टीत फोफावलेला ड्रग्स व्यवहार तसेच पर्रीकर केंद्रात गेल्यानंतर एकूण गोव्यातील जी स्थिती आहे, त्यासंबंधी लोबो यांनी विवेचन केले. लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. फाईल्स या टेबलवरून त्या टेबलवर फिरतात. काँग्रेस सरकारने कु कर्मे केली म्हणून लोकांनी भाजपला निवडून दिले, ही गोष्ट विसरून चालणार नाही. बेकायदा गोष्टींबाबत आवाज उठवणे, हे आपले काम आहे आणि आपण नेहमीच ते करणार, असेही त्यांनी पर्रीकरांना सांगितले. पर्रीकर यांनी आपण या प्रकरणात लक्ष घालतो, असे आश्वासन दिलेले आहे, असे लोबो यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, पर्रीकर शुक्रवारी एक दिवसाकरिता गोव्यात येत आहेत. त्यानंतर १ मार्च रोजी ते पुन्हा गोव्यात येतील. त्या वेळी सविस्तर बोलू, असे लोबो यांना त्यांनी सांगितलेले आहे. (प्रतिनिधी)