१५ दिवसांत बघूया काय चमत्कार होतो; उत्पल पर्रीकर यांची खड्ड्यांबाबत प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:51 IST2025-11-24T11:51:55+5:302025-11-24T11:51:55+5:30
उत्पल पर्रीकर यांनी पणजी परिसरात रस्ते खड्डेमय झाल्याचा विषय मांडला होता.

१५ दिवसांत बघूया काय चमत्कार होतो; उत्पल पर्रीकर यांची खड्ड्यांबाबत प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी शनिवारी राज्यातील सर्व खड्डेमय रस्त्यांची पंधरा दिवसांच्या आत डागडुजी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना उत्पल पर्रीकर म्हणाले, आम्ही गेले वर्षभर वाट पाहिली आहे. आता आणखी १५ दिवस वाट पाहू शकतो. या १५ दिवसांत काय चमत्कार होतो ते पाहुया, अशी टिप्पणी रविवारी एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी केली आहे.
उत्पल पर्रीकर यांनी पणजी परिसरात रस्ते खड्डेमय झाल्याचा विषय मांडला होता. या विषयी मंत्री दिगंबर कामत यांनी विचारले असता त्यांनी १५ दिवसात राज्यात एकही खड्डा रस्त्यावर दिसणार नाही, असे आश्वासन दिले होते.
पणजीतील बहुतांश रस्ते खड्डेमय
उत्पलनेही त्यांचे हे आश्वासन मनावर न घेता आपण १५ दिवस वाट पाहणार, असे म्हटले आहे. पणजीत फक्त एकाच परिसरात नाही, तर बहुतांश प्रभागांतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे हे सर्व रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे.