गोव्यात काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चेने नेतृत्व नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 11:53 AM2019-06-08T11:53:42+5:302019-06-08T11:53:52+5:30

गोव्यातील काँग्रेसचे चार आमदार फुटून भाजपमध्ये जातील अशा प्रकारची चर्चा पसरल्यानंतर काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व नाराज झाले.

Leaders are angry with the discussion that Congress may be formed in Goa | गोव्यात काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चेने नेतृत्व नाराज

गोव्यात काँग्रेस फुटणार असल्याच्या चर्चेने नेतृत्व नाराज

Next

पणजी : गोव्यातील काँग्रेसचे चार आमदार फुटून भाजपमध्ये जातील अशा प्रकारची चर्चा पसरल्यानंतर काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व नाराज झाले. भाजपवाले आपल्या पक्षाच्या आमदारांना पक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतात, त्याविषयीची शक्यता नाकारता येत नाही, असे काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटते.

गोव्यात काँग्रेस पक्षाचे सरकार अधिकारावर येईल असे काँग्रेसच्या सर्व आमदारांना लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले होते. पणजीत पोटनिवडणूक लढवितानाही काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी वारंवार तशीच घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार अधिकारावर येईल व मग गोव्यातही सत्ता बदल होईल, असे मोन्सेरात यांना वाटले होते. दिगंबर कामत, लुईङिान फालेरो, रवी नाईक, बाबू कवळेकर असे काही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते पण केंद्रात पुन्हा मोदी सरकारच अधिकारावर आल्याने काँग्रेसच्या आमदारांचा अपेक्षाभंग झाला. आता आमदारांना संघटीत आणि भाजपच्या डावपेचांपासून दूर ठेवण्याचे आव्हान काँग्रेसच्या विधिमंडळ गटाचे नेते कवळेकर यांच्यासमोर आहे.

काँग्रेसचे फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक यांना भाजपमध्ये प्रवेश करा असे  निमंत्रण भाजपने दिले असल्याची चर्चा पसरली होती. नाईक यांनी लोकमतशी बोलताना या चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले. काहीजण उगाच अफवा पसरवून काँग्रेसला बदनाम करू पाहत आहेत, असे नाईक म्हणाले. आपण भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही असे ते म्हणाले.

काँग्रेसचे कुंकळ्ळी मतदारसंघाचे आमदार क्लाफास डायस यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकत्र्याशी सल्लामसलत सुरू केल्याची चर्चा वृत्त वाहिन्यांवर रंगली होती. लगेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी डायस यांच्याशी चर्चा केली व वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या विधानांचा मिडियाने चुकीचा अर्थ लावला आहे, आपण काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही असे डायस यांनी चोडणकर यांना व पत्रकारांनाही सांगितले. मात्र काँग्रेसचे फ्रान्सिस सिल्वेरा व इजिदोर फर्नाडिस हे दोन आमदार काँग्रेस पक्ष सोडू शकतात अशा प्रकारच्या अफवा वारंवार गोव्यात पसरू लागल्या आहेत.

Web Title: Leaders are angry with the discussion that Congress may be formed in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.