होळी उत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:00 IST2026-03-03T12:59:52+5:302026-03-03T13:00:53+5:30

प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

konkan railway will run special trains for holi festival | होळी उत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

होळी उत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि कोकणदरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सणानिमित्त गावी जाणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

सीएसएमटी - मडगाव द्विसाप्ताहिक विशेष (०१०४९/०१०५०): मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान गाडी क्रमांक ०१०४९ ही विशेष गाडी ३ मार्च आणि ६ मार्च २०२६ रोजी धावणार आहे. ही गाडी मध्यरात्री १२:३० वाजता मुंबईहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०५० मडगावहून ३ आणि ६ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:२० वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीला एकूण २० डबे असून, त्यामध्ये १८ कोच "३-टियर एसी इकॉनॉमी" श्रेणीचे असतील.

एलटीटी मडगाव विशेष (०१०४७/०१०४८) : लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान ७ मार्च रोजी रात्री १०:१५ वाजता विशेष गाडी (०१०४७) सुटेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०४८ मडगावहून ८ मार्च रोजी संध्याकाळी ६:०० वाजता सुटेल. या गाडीत २-टियर एसी, ३-टियर एसी, स्लीपर आणि जनरल असे एकूण २२ डबे असतील. थिरुवनंतपुरम मदार जंक्शन साप्ताहिक विशेष (०६०१३/०६०१४): दक्षिण भारतातून येणारी ही गाडी ४ आणि ११ मार्च रोजी थिरुवनंतपुरम येथून सुटेल. ही गाडी कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर थांबणार असल्याने कोकणवासियांना याचा मोठा लाभ घेता येईल. या गाडीत २० स्लीपर कोचची सोय करण्यात आली आहे.

या सर्व विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबतील. प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

Web Title : होली के लिए कोंकण रेलवे चलाएगा विशेष ट्रेनें

Web Summary : होली की भीड़ को कम करने के लिए, कोंकण रेलवे मुंबई और कोंकण के बीच विशेष ट्रेनें चलाएगा। छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य तिलक टर्मिनस, और तिरुवनंतपुरम से ट्रेनें चलेंगी, जो प्रमुख स्टेशनों पर रुकेंगी। इससे यात्रियों को राहत मिलेगी।

Web Title : Konkan Railway to Run Special Trains for Holi Festival

Web Summary : To ease Holi rush, Konkan Railway will run special trains between Mumbai and Konkan. Trains will operate from CSMT, LTT, and Thiruvananthapuram, stopping at key stations. This provides relief and easier travel planning for festival-goers.