राज्यात नोकऱ्यांचा 'जॅकपॉट', 'जिओ'च्या माध्यमातून ३ लाख युवकांना रोजगार; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 11:13 IST2025-03-08T11:12:07+5:302025-03-08T11:13:03+5:30

या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

job jackpot in the state employment for 3 lakh youth through jio cm pramod sawant informed | राज्यात नोकऱ्यांचा 'जॅकपॉट', 'जिओ'च्या माध्यमातून ३ लाख युवकांना रोजगार; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

राज्यात नोकऱ्यांचा 'जॅकपॉट', 'जिओ'च्या माध्यमातून ३ लाख युवकांना रोजगार; मुख्यमंत्री सावंत यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : तरुणांनी 'वर्क कल्चर' विकसित करण्याची गरज आहे. नोकरीसाठी यापुढे अनुभव महत्वाचा. राज्यात जिओमार्फत ३ लाख रोजगार निर्माण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्य उच्च शिक्षण संचालनालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्या वतीने साखळी रवींद्र भवनमध्ये काल, शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

तरुणांनो, नोकरदार नव्हे तर उद्योजक बना!

या मेळाव्याचा उद्देश शैक्षणिक, व्यावसायिक अनुभव यांच्यातील अंतर कमी करणे, तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्यांनी सुसज्ज करणे हा आहे. पीएमआयएस ही तरुणांसाठी कौशल्ये अपग्रेड करण्याची आणि नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारे म्हणून उदयास येण्याची एक उत्तम संधी आहे. राज्य सरकार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध प्रकल्प राबवत असून कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्यावर भर देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यात कुशल मनुष्यबळ कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. जिओसारख्या कंपनीमार्फत तीन लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तरुणांनी संधीचा फायदा घ्यावा. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Web Title: job jackpot in the state employment for 3 lakh youth through jio cm pramod sawant informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.