'दारुच्या नशेत झारखंडच्या कामगाराचा चुलत भावाकडूनच खून'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 18:13 IST2019-11-25T18:13:28+5:302019-11-25T18:13:31+5:30

म्हैसाळ—भांडोळी येथील स्टोन क्रशरवरील घटना : आरोपी फरारी

Jharkhand cousin murdered by drunk drug addict brother | 'दारुच्या नशेत झारखंडच्या कामगाराचा चुलत भावाकडूनच खून'

'दारुच्या नशेत झारखंडच्या कामगाराचा चुलत भावाकडूनच खून'

मडगाव : स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये दारुच्या नशेत झालेल्या भांडणात एका कामगाराकडून दुसऱ्याच्या डोक्यावर लोखंडी पाईप हानून दिलीप केरकेटा (24) या झारखंडच्या कामगाराचा खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी अजितकुमार केरकेटा (30) याने खुनानंतर घटनास्थळाहून पळ काढला. सध्या हा आरोपी फरारी असून कुडचडे पोलीस त्याच्या शोधात आहेत.

कुडचडेपासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या म्हैसाळ येथील आयव्हर ब्रागांझा यांच्या मालकीच्या स्टोन क्रशरवर रविवारी रात्री ही घटना घडली. आरोपी अजितकुमार हा मयताचा चुलत भाऊ असून त्या दोघांत काही कारणावरुन भांडण झाल्याने त्याचे पर्यावसन खुनात झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना दर रविवारी पगार घातला जातो. रविवारी त्या दोघांकडेही पगाराचे पैसे असल्याने त्यांनी भरपूर दारु घेतली होती. रात्री त्यांच्यात भांडण सुरु झाले. रागाच्या भरात आरोपीने लोखंडी पाईप दिलीपच्या डोक्यात हाणला. दिलीप रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संशयिताने रात्रीच्याचवेळी घटना थळावरुन पळ काढला.
 

Web Title: Jharkhand cousin murdered by drunk drug addict brother