फोंडा पोटनिवडणूक रद्द निवाड्याला आव्हान देणे योग्य वाटले नाही : दामू नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:33 IST2026-04-15T07:33:00+5:302026-04-15T07:33:26+5:30

फोंडा पोटनिवडणूक रद्द केल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

it was not considered appropriate to challenge the verdict cancelling the ponda bypoll election said damu naik | फोंडा पोटनिवडणूक रद्द निवाड्याला आव्हान देणे योग्य वाटले नाही : दामू नाईक

फोंडा पोटनिवडणूक रद्द निवाड्याला आव्हान देणे योग्य वाटले नाही : दामू नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणे पक्षाला योग्य वाटले नाही. त्यामुळेच या निवाड्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले.

फोंडा पोटनिवडणूक रद्द केल्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर काय निर्णय येतो, ते पाहावे असेही मत त्यांनी व्यक्त केले. नाईक म्हणाले, की फोंडा मतदारसंघाला मागील अनेक महिन्यांपासून आमदार नाही. मात्र, भाजपची संघटना तेथे काम करीत आहे. तसेच मतदारसंघातही बऱ्यापैकी कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील फोंड्याकडे लक्ष देत आहेत. योग्य पद्धतीने तसेच नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयाने ही रद्द करण्याचा जो निवाडा दिला त्यावर काहीच बोलणार नाही. निवडणुकीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाची भूमिका होते. त्यात सरकारचा कुठलाही संबंध नव्हता. काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Web Title: it was not considered appropriate to challenge the verdict cancelling the ponda bypoll election said damu naik