गोव्याच्या हद्दीवर 'ईसीस'चा तळ; तपास एजन्सीकडून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:53 PM2023-10-04T15:53:23+5:302023-10-04T15:53:44+5:30

पुणे पोलिस आणि राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) ही माहिती उघड केली आहे.

isis camp on goa border shocking revelation from the investigating agency | गोव्याच्या हद्दीवर 'ईसीस'चा तळ; तपास एजन्सीकडून धक्कादायक खुलासा

गोव्याच्या हद्दीवर 'ईसीस'चा तळ; तपास एजन्सीकडून धक्कादायक खुलासा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : जगात हिंसाचाराचा आगडोंब उसळविणाऱ्या 'ईसीस' या जागतिक दहशतवादी संघटनेच्या कारवाया या गोव्याच्या दरवाजापर्यंत येऊन ठेपल्या होत्या. गोवा-कर्नाटकच्या हद्दीत या दहशतवाद्यांचे तळ होते आणि ते मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. पुणे पोलिस आणि राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) ही माहिती उघड केली आहे.

पुणे पोलिस आणि एनआयएने केलेल्या संयुक्त कारवाईत आयएसआयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्याच्या चौकशीतून अनेक गोष्टी आता बाहेर आल्या आहेत. देशात किमान १८ ठिकाणी मोठा दहशतवादी हल्ला करून हिंसाचार घडवून आणण्याचा त्यांचा डाव होता. याची पुष्टी देणारे अनेक पुरावेही एनआयएला मिळाले आहेत. त्याचा तपास सुरू आहे.

या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे मुहंमद शाहनवाज आलम ऊर्फ अब्दुल्ला ऊर्फ मोहम्मद इब्राहिम ऊर्फ प्रिन्स, मुहंमद अर्शद वारसी आणि मुहंमद रिजवान अश्रफ अशी आहेत. शाहनवाजला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर इतरांना अटक करण्यात आली. शाहनवाज याच्यावर तीन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यांचा तळ जरी गोव्याच्या हद्दीवर असला तरी उत्तर भारतात हल्ले करण्याची त्यांनी तयारी चालविली होती.

ईसीसच्या दहशतवाद्यांच्या कारवाया या गोव्यालगतच्या कर्नाटक हद्दीत आढळून आल्याचे वृत होते. अशा प्रकारच्या काही कारवाया झाल्या असाव्यात. या दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी जंगलात त्यांनी स्फोट घडवून आणल्याचेही वृत्त होते. परंतु, त्यांनी गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला नाही. -डॉ. जसपाल सिंग, पोलिस महासंचालक

 

Web Title: isis camp on goa border shocking revelation from the investigating agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.