अभिनव प्रयोग! गॅसला पर्याय, टाकाऊ इंधनावर चालणाऱ्या शेगडीची निर्मिती; भांडी काळपट होत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:37 IST2026-04-04T10:37:25+5:302026-04-04T10:37:46+5:30

गॅसटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा, टाकाऊ इंधनाचा वापर करून सुरक्षित शेगडी तयार करीत एक अभिनव पर्याय उपलब्ध.

innovative experiment in goa an alternative to gas the creation of a shegdi that runs on waste fuel | अभिनव प्रयोग! गॅसला पर्याय, टाकाऊ इंधनावर चालणाऱ्या शेगडीची निर्मिती; भांडी काळपट होत नाहीत

अभिनव प्रयोग! गॅसला पर्याय, टाकाऊ इंधनावर चालणाऱ्या शेगडीची निर्मिती; भांडी काळपट होत नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: आखातात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यवसायावरही होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गॅससाठी रांगा लागल्याने पर्यायी साधनांची गरज भासू लागली आहे. अशा परिस्थितीत म्हापसाजवळील नास्नोळा येथील प्रवीण चारी यांनी टाकाऊ इंधनाचा वापर करून सुरक्षित शेगडी तयार करीत एक अभिनव पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

म्हापसा येथील सरकारी आयटीआयचे ब्रँड अॅम्बेसेडर आणि गेल्या तीन दशकांहून अधिक काळ फॅब्रिकेशन व्यवसायात कार्यरत असलेल्या चारी यांनी ही शेगडी अवघ्या काही दिवसांत तयार केली. गॅसटंचाईच्या काळात नागरिकांना पर्याय मिळावा, या उद्देशाने हा प्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला कॉम्प्रेसरच्या साहाय्याने हवा फुंकून स्वतःसाठी प्रयोगात्मक शेगडी तयार केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मोठ्या आकाराची शेगडी विकसित करण्यात आली. या शेगडीत हॉटेलमधून निर्माण होणारे टाकाऊ इंधन तसेच वाहनांमधील वापरलेले ऑइल वापरता येते. त्यामुळे टाकाऊ ऑइलचा पुनर्वापर होऊन पर्यावरणालाही लाभहोत असल्याचे चारी यांनी नमूद केले.

शेगडी पूर्णपणे सुरक्षित

या शेगडीमध्ये ऑइल टाकीतून बर्नरकडे इंधन पुरवठा केला जातो. शेगडीचा आकार मोठा असल्याने वापर सोयीस्कर असून, या शेगडीवर वापरलेली भांडी काळपट होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. घरगुती वापरासाठी एक बर्नरची लहान शेगडी, तर व्यावसायिक वापरासाठी दोन बर्नरची मोठी शेगडी अशा दोन प्रकारांत ही निर्मिती करण्यात आली आहे. ही शेगडी पूर्णपणे सुरक्षित असून, वापरकर्त्यांकडून आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे चारी यांनी सांगितले.

Web Title : नवीन स्टोव बेकार तेल का उपयोग करता है, गैस का विकल्प, बर्तन साफ रखता है।

Web Summary : मापुसा के प्रवीण चारी ने बेकार तेल का उपयोग करके एक सुरक्षित स्टोव बनाया, जो गैस की कमी के बीच एक विकल्प प्रदान करता है। यह नवीन स्टोव होटलों और वाहनों से छोड़े गए तेल का उपयोग करता है, पुन: उपयोग और पर्यावरण लाभों को बढ़ावा देता है। स्टोव सुरक्षित, उपयोग में आसान है और बर्तनों को काला नहीं करता है।

Web Title : Innovative stove uses waste oil, offers gas alternative, keeps pots clean.

Web Summary : Praveen Chari from Mapusa created a safe stove using waste oil, offering an alternative to gas amid shortages. This innovative stove uses discarded oil from hotels and vehicles, promoting reuse and environmental benefits. The stove is safe, easy to use, and doesn't blacken pots.