चक्क आजोबाकडून नातीचाच विनयभंग; पोलीस तपास चालू
By आप्पा बुवा | Updated: August 31, 2023 19:02 IST2023-08-31T19:01:54+5:302023-08-31T19:02:13+5:30
पोलिसांकडून ह्या बाबतीत अजून ठोस काही माहिती मिळालेली नाही.

चक्क आजोबाकडून नातीचाच विनयभंग; पोलीस तपास चालू
फोंडा (गोवा) : मडकई येथील शिक्षकानेच आपल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा पोलीस स्थानकात आणखीन एक विनयभंगाची घटना नोंद झाली असून, यावेळी आजोबांनी आपल्या नातीचा विनयभंग केल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलीच्या आईनेच ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार नोंद करून फोंडा पोलीस सर्व अंगाने या गुन्ह्याचा तपास करत आहेत. पोलिसांकडून ह्या बाबतीत अजून ठोस काही माहिती मिळालेली नाही.