शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चिरडले : मडगाव येथील घटना; चालक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 16:53 IST

मडगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर एका भरधाव खासगी बसच्या धडकेत रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला.

तुकाराम गोवेकर, मडगाव : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर एका भरधाव खासगी बसच्या धडकेत रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. अपघातात तिच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव झाला. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.

आज, शनिवारी घटना सकाळी १०.३० च्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. शिला बोटेकर (वय ६०, रा. दिकरपाली-दवर्ली) असे मृत महिलेचे नाव आहे.  तर उदय वडार (वय ३८) या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.  बोटेकर या यल्लमा देवीची भक्त असून डोक्यावर देवीची मूर्ती घेऊन जुन्या बस स्थानक परिसरातील दुकानदार, विक्रेत्यांकडून दक्षिणा घेऊन जात होत्या. 

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे रस्ता ओलांडून पालिका उद्यानाच्या दिशेने ते जात असताना काणकोणहून मडगाव कदंब बस स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूक बसची तिला जबर धडक बसली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. मडगाव पोलिसांना घटनास्थळी धाव घेत  स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.या प्रकरणी खासगी बस चालक उदय वडार (वय ३८) याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अपघातास करणीभूत बसही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मडगावचे पोलीस निरिक्षक तुळशिदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात