रोहन खंवटेमुळे आयटी, पर्यटन खात्यात सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:37 IST2026-02-26T13:31:48+5:302026-02-26T13:37:58+5:30

मंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, रक्तदान शिबिराचेही आयोजन

Improvements in IT tourism department due to minister rohan khawte said cm pramod sawant | रोहन खंवटेमुळे आयटी, पर्यटन खात्यात सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

रोहन खंवटेमुळे आयटी, पर्यटन खात्यात सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा करण्यासाठी भाजपला २०२७निवडणुकीत विजयी करा. आधुनिक तंत्रज्ञानामुळे भारत देश विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. एआय मिशन राबवण्याचा पहिला मान गोव्याला मिळाला आहे. आयटी आणि स्टार्टअप धोरणांतर्गत नवनवीन आयटी कंपन्या तयार करण्याचा प्रयत्न आहे. मंत्री रोहन खंवटे यांनी आयटी व पर्यटन खात्यात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. ते अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या वाढदिवस सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, सभापती गणेश गावकर, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई, इतर आमदार, पेन्ह द फ्रांसचे जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर, सुकूरचे जि. पं. सदस्य अमित अस्नोडकर, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, सुकूर सरपंच सोनिया पेडणेकर, मंत्री खंवटे यांच्या मातोश्री सुनंदा खंवटे व कुटुंबीय तसेच तिन्ही पंचायतीचे पंच सदस्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

तत्पूर्वी सकाळी मंत्री खंवटे यांच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. यावेळी संजय स्कूलचे विद्यार्थी उपस्थितीत होते. मंत्री खंवटे म्हणाले की, पर्वरीकर माझे कुटुंबीय आहेत. त्यांनी मला संपूर्ण साहाय्य केले आहे. मतदारसंघातील तिन्ही पंचायत मंडळाने सतत सहकार्य केले. २०१२ आणि २०१७ या दोन्ही निवडणुकी अपक्ष म्हणून लढवल्या त्यामध्ये पर्वरीकरांनी मला पाठिंबा देत भरघोस मतांनी निवडून दिले. २०२२ मध्ये भाजपमधून निवडणूक लढवली त्यामध्येही यशस्वी झालो हे सर्व त्यांच्या मदतीमुळेच. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मला उत्तम सहकार्य आणि पाठिंबा दिल्यामुळे मतदारसंघात रस्ते, पाणी आणि वीज तसेच अनेक प्रकल्प निर्माण करण्यात यशस्वी झालो. यावेळी सभापती गणेश गावकर, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक शुभेच्छा दिल्या.

Web Title : रोहन खंवटे के आईटी, पर्यटन सुधारों की सीएम प्रमोद सावंत ने सराहना की

Web Summary : सीएम प्रमोद सावंत ने मंत्री रोहन खंवटे द्वारा गोवा के आईटी और पर्यटन क्षेत्रों में किए गए बदलावों की सराहना की। उन्होंने विकसित गोवा के लिए 2027 में भाजपा को समर्थन देने का आग्रह किया। खंवटे ने समर्थन के लिए परवरिकर्स को धन्यवाद दिया और सीएम द्वारा संभव किए गए विकास कार्यों पर प्रकाश डाला।

Web Title : Rohan Khawte's Reforms in IT, Tourism Praised by CM Pramod Sawant

Web Summary : CM Pramod Sawant lauded Minister Rohan Khawte for transforming Goa's IT and tourism sectors. He urged support for BJP in 2027 to realize a developed Goa. Khawte thanked Parvarikars for their support and highlighted developmental projects made possible by the CM.