शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

बेकायदेशीर मृत्युदाखला प्रकरणी गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 8:07 PM

गोमेकॉतील फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर सिद्धार्थ बाणावलीकर यांना बेकायदेशीररित्या मृत्युचे दाखले देण्याच्या प्रकरणात सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोग्य खात्याच्या विशेष तपास समितीच्या अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने सरकारच्या शिफारशीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पणजी - गोमेकॉतील फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर सिद्धार्थ बाणावलीकर यांना बेकायदेशीररित्या मृत्युचे दाखले देण्याच्या प्रकरणात सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आरोग्य खात्याच्या विशेष तपास समितीच्या अहवालात त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याने सरकारच्या शिफारशीनंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे मृत्युचे दाखले देण्याच्या प्रकरणात डॉ बाणावलीकर यांची आरोग्य खात्याकडून चौकशी सुरू केली होती. त्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने तपासाचा अहवाल काही महिन्यांपूर्वी सरकारला सादर केला होता. तसेच डॉ बाणावलीकर हे अवैधरित्या मृत्युचे दाखले देतााच पोलीस प्रकरणातही अडकले गेले. फोंडा येथे एका संशयास्पद मृत्यु प्रकरणात त्याने दिलेला मृत्युचा दाखला हा त्यांच्या अंगलट आला होता. त्यामुळे क्राईम ब्रँॅचकडूनही त्याची चौकशी झाली होती. क्राईम ब्रँचच्या अहवालातही तो दोषी आढळला होता. या दोन्ही अहवालांच्या निष्कर्षावरून त्याला सेवेतून निलंबित करण्याची  शिफारस सरकारने  दक्षता खात्याला केली होती. मंगळवारी या प्रकरणात दक्षता खात्याकडून बाणावलीकर यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. निलंबन काळात बाणावलीकर यांना सचिवालयात सार्वजनिक आरोग्य खात्यात हजेरी लावावी लागणार आहे. फोरन्सिक विभागातील डॉक्टर इतर  ठिकाणी जाऊन मृत्युचे दाखले देऊ शकत नाही. गोमेकॉच्या नियमांचा तो भंग ठरत आहे. परंतु हे नियम गुंडळून ठेऊन बाणावलीकर मृत्युचे दाखले देत होते. दाखल्याच्या नावाने पैसे घेत नव्हते परंतु प्रवास खर्चाच्या नावाखाली  पैसे घेत होते असे त्यांच्यावर आरोप होते. या प्रकरणाची अरोग्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशीचा आदेश दिला होता.

टॅग्स :goaगोवाdoctorडॉक्टर