शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत सिनेमा दाखविण्यास हरकत नाही- मनोहर पर्रीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 18:58 IST

सेन्सॉर मंडळाचे जर प्रमाणपत्र असेल तर मग पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत घेण्याचे कारण दिसत नाही. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत दाखविण्यास माझा तरी तत्त्वत: विरोध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.

पणजी : सेन्सॉर मंडळाचे जर प्रमाणपत्र असेल तर मग पद्मावत सिनेमा गोव्यात प्रदर्शित करण्यास हरकत घेण्याचे कारण दिसत नाही. सेन्सॉरचे प्रमाणपत्र असल्यास पद्मावत दाखविण्यास माझा तरी तत्त्वत: विरोध नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.पर्रीकर म्हणाले, की पद्मावत चित्रपटाकडे सध्या सेन्सॉर मंडळाचे प्रमाणपत्र नाही, अशी माहिती मिळते. सेन्सॉरचे प्रमाणपत्र नसताना सिनेमा दाखविताच येत नाही. गेल्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट गोव्यात दाखविण्याची मागणी झाली होती, त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे हे क्लेशकारक ठरले असते. कारण त्यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी गोव्यात असते. यापुढेही जर सेन्सॉरचे प्रमाणपत्र असेल तर त्याविषयी विचार करता येईल, पण आताच निर्णय घेता येत नाही. त्यावेळची परिस्थिती पाहावी लागते. पोलीस खाते ते काम करील.बीफप्रश्नी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की कायदेशीर पद्धतीने गोव्यात बीफची आयात करण्यास आक्षेपच नाही. त्याला कुणी हरकत घेऊ शकत नाही. पोलिसांकडून गोव्याच्या सीमांवर बीफ आयातीवेळी कागदपत्रे तपासली जातील. कायदेशीर पद्धतीने येत असलेले बीफ कुणी अडवू शकत नाही. जे कथित गोरक्षक आक्षेप घेत आहेत, त्यांनी जर कायदेशीर पद्धतीने येणा-या बीफच्या विषयात हस्तक्षेप करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर त्यांच्याविरुद्ध करवाई केली जाईल.म्हादई पाणीप्रश्नी बोलताना पर्रीकर म्हणाले, की म्हादईचा विषय हा आपल्यापुरता संपलेला आहे. कारण हा विषय लवादासमोर आहे. अकारण प्रसारमाध्यमांनीच हा विषय वाढवला. आपण चर्चेसाठी तयार आहे, असे कर्नाटकला कळवले. आपण पाणी देतो, असे कळवले नाही. तरी देखील पत्राचा वेगळा अर्थ लावला गेला. मी दिल्ली भेटीवेळी म्हादई पाणी प्रश्नी कुणाशी बोललो नाही. कारण आता तो विषय राहिलेलाच नाही. दरम्यान, गोव्यात मांडवी नदीवर जो तिसरा पूल उभा राहत आहे, त्याचे काम येत्या जून-जुलैमध्ये पूर्ण होईल. साधारणत: ऑगस्ट महिन्याच्या आसपास या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले आहे. पंतप्रधानांनी निमंत्रण स्वीकारले आहे. शक्य झाल्यास दोन पावलं येथे ऑगस्टमध्येच कन्वेन्शन सेंटरचीही पायाभरणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Padmavatपद्मावतManohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाPadmavatiपद्मावती