शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

गॅस दरवाढ ७ दिवसांत मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरू, महिला काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 20:52 IST

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ९00 रुपयांवर पोहोचल्याने महिला काँग्रेसने संताप व्यक्त केला असून येत्या ७ दिवसात दर कमी न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

पणजी : स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर ९00 रुपयांवर पोहोचल्याने महिला काँग्रेसने संताप व्यक्त केला असून येत्या ७ दिवसात दर कमी न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना राज्य सरकारने काही भार आपण सोसावा आणि सिलिंडरवर सबसिडी देऊन लोकांना कमी दरात ते उपलब्ध करावेत, अशी मागणी केली. त्या म्हणाल्या की, गेल्या महिनाभराच्या कालावधीतच तब्बल ५९ रुपयांनी दर वाढला. सध्या ८९६ रुपये दर असला तरी ९00 रुपये आकारले जातात.गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या दरवाढीचा पाढाच त्यांनी वाचला. त्या म्हणाल्या की, जानेवारीत सिलिंडरचा दर ७५२ रुपये होता. जुलैमध्ये तो ७७१ वर पोचला त्यानंतर गेल्या महिन्यात ८४0 झाला. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे. गृहिणींचे बजेटच त्यामुळे हलले आहे. कुतिन्हो म्हणाल्या की, गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भ्रष्ट पक्ष म्हणून चुकीचे चित्र भाजपाने उभे केले इतकेच नव्हे तर महागाई वाढ काँग्रेसच्या काळातच झाल्याचे जनतेला सांगून दिशाभूल केली. काँग्रेसच्या काळात सिलिंडरचा दर केवळ ४ रुपयांनी वाढला तेव्हा स्मृती इराणी आणि सुषमा स्वराज यांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली होती. या दोघीही तसेच भाजपाच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आज सिलिंडरचा दर गगनाला भिडला असताना आहेत कुठे?, असा सवाल त्यांनी केला.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने इस्पितळात उपचार घेत आहेत, त्यामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून दूर होऊन आपल्या आरोग्याकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन कुतिन्हो यांनी केले. महिला उपाध्यक्षा बीना नाईक म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना बँक खाती उघडायला लावली. परंतु त्यांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन काही पूर्ण केले नाही. २0१३ साली कोटी नोक-यांचे आश्वासन मोदींनी दिले होते त्याचे काय झाले?, असा सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषदेस इतर महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.

टॅग्स :congressकाँग्रेस