शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

होबळेंची आव्हान याचिका फेटाळली

By admin | Updated: July 2, 2015 01:34 IST

पणजी : पाटो-रायबंदर येथील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट पाडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशास आव्हान देणारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांची याचिका

पणजी : पाटो-रायबंदर येथील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट पाडण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशास आव्हान देणारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावली आहे. सीआरझेड उल्लंघनाचा ठपका या बांधकामावर असून हरित लवादाने २0 लाख रुपये दंडही ठोठावलेला आहे. न्यायमूर्ती एफ. एम. रेईश व न्यायमूर्ती के. एल. वधाने यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. लवादाने बांधकाम पाडण्याचा दिलेला आदेश, तसेच २0 लाखांचा ठोठावलेला दंड न्यायाला धरून नसल्याचा दावा होबळे यांनी हायकोर्टात केला होता व या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी त्यांची मागणी होती. होबळे यांच्या वकिलाने या सुनावणीत युक्तिवाद करताना सर्व्हे क्रमांक १/१0 मध्ये असलेल्या वास्तूबाबत कोणताही बेकायदेशीरपणा नसताना तेथील व्यवसायही बंद पाडल्याने आपल्या अशिलास आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याचे म्हटले होते. २0 लाखांचा दंड अन्याय्य असून तो भरण्यास अशील असमर्थ असल्याचे होबळे यांच्या वकिलाने म्हटले होते. त्याला आक्षेपघेताना आयरिश यांनी होबळे यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि मर्सिडीझ बेन्झसारखी महागडी कार त्यांच्याकडे आहे, असा दावा केला होता. होबळे यांच्या बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटच्या बाबतीत पर्यावरणाचा विनाश तसेच सीआरझेडचे उल्लंघन झालेले असल्याने ते पाडण्याचा तसेच पर्यावरण हानीबद्दल सहा महिन्यांच्या आत २0 लाख रुपये दंड भरण्याचा आदेश लवादाने दिलेला आहे. (प्रतिनिधी)