शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मुंडके छाटलेला ‘तो’ मृतदेह सुल्तानचाच?

By admin | Updated: June 24, 2015 01:28 IST

९ जानेवारी २0११ रोजी रामनगरी-मुगाळी येथे मुंडके छाटलेल्या अवस्थेत जो मृतदेह सापडला होता, तो नक्की सुल्तान बेल्लारीचाच होता का? ही घटना

९ जानेवारी २0११ रोजी रामनगरी-मुगाळी येथे मुंडके छाटलेल्या अवस्थेत जो मृतदेह सापडला होता, तो नक्की सुल्तान बेल्लारीचाच होता का? ही घटना घडून जवळपास साडेचार वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर हा प्रश्न उभा झाला आहे. हा मृतदेह सुल्तानचाच असल्याचे पोलीस नि:संदिग्धपणे सिद्ध करू शकलेले नसून या प्रकरणात तपास करताना राहिलेल्या असंख्य त्रुटी यामुळेच या प्रकरणातील संशयितांना निर्दोष मुक्त होण्याची संधी प्राप्त झाल्याचे एकंदर खटल्याचा आढावा घेतला असता दिसून येते.या प्रकरणात दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी अजूनही निकालाची प्रत जाहीर केलेली नाही. मात्र, खुल्या न्यायालयात सोमवारी त्यांनी संक्षिप्तपणे जो आदेश दिला, त्यात संशयितावरील आरोप सिद्ध करण्यास अभियोग पक्षाला पूर्णपणे अपयश आल्याचे नमूद केले होते. बजरंग दलाचा नेता जयेश नाईक याचा या संशयितांमध्ये समावेश असल्याने, तसेच या संघटनेचे आणखी काही सदस्यही या प्रकरणात संशयित असल्याने या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होेते.या प्रकरणात अभियोग पक्षाचा दावा असा होता की, व्यवसायाने चोर असलेल्या सुल्तान बेल्लारीने सध्या निर्दोष सुटलेला संशयित राजेश नाईक याच्या दुकानात चोरी केली. या वेळी दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर सुल्तानची छबी उमटली. याच छबीच्या आधारे इतरांनी सुल्तानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पेड-सुरावली येथे सुल्तान राहात असल्याची माहिती मिळाल्यावर तिथून त्याचे अपहरण करण्यात आले होते. नंतर त्याला समर्थ गडावरील व्यायामशाळेत कोंडून ठेवले. सध्या फरारी असलेला संशयित विनोद यादव याने त्याचा नानाप्रकारे छळ केला. या छळामुळे गलितगात्र झालेल्या सुल्तानचे प्राण जाणार याची खात्री पटल्यावर चॉपरने त्याचे मुंडके छाटण्यात आले.(पान २ वर)