चोरलेली मोटरसायकल घेऊन 'तो' ऐटीत जात होता

By आप्पा बुवा | Updated: October 20, 2023 18:43 IST2023-10-20T18:42:36+5:302023-10-20T18:43:14+5:30

शयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने सदरची मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले.

'He' was going after a stolen motorcycle in goa | चोरलेली मोटरसायकल घेऊन 'तो' ऐटीत जात होता

चोरलेली मोटरसायकल घेऊन 'तो' ऐटीत जात होता

फोंडा - चोरलेली मोटरसायकल घेऊन ऐटीत जात असताना पिळये धारबांदोडा येथे मोटरसायकल चोर पोलिसांच्या तावडीत सापडला. संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने सदरची मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले.

सविस्तर वृत्तानुसार उसगाव येथील केतन कृष्णाजी कुलकर्णी (वय 29, राहणार उसगाव याने 19 ऑक्टोबर रोजी आपली मोटरसायकल (नंबर एमएच --१३- इडी- 66 92) ही उसगाव येथील हनुमान देवळाच्या परिसरात पार्क करून ठेवली होती .संध्याकाळी तो आपली मोटरसायकल घेण्यास आल असता त्याला तिथे मोटरसायकल आढळून आली नाही. त्यांने तत्काळ या संदर्भात पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली. पोलिसांनी परिसरात मिळालेल्या फुटेज च्या आधारे संशयताची ओळख तयार करून ती सर्वत्र पाठवली होती.

मोटरसायकल चोरी केलेला सुशांत सुखडो गावडे ( वय 24, राहणार नाणूस उजगाव) हा चोरलेली मोटरसायकल घेऊन ऐटीत फिरत असताना बरोबर पोलिसांच्या तावडीत सापडला. संशयाने गुन्हा कबूल केला असून त्याला न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई केली आहे.

Web Title: 'He' was going after a stolen motorcycle in goa