गुजरातच्या युवकाचा गोव्यात अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:22 AM2019-12-24T11:22:08+5:302019-12-24T11:22:16+5:30

गुजरातातील वडोदरा येथील एका युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू झाला.

Gujarat youth dies in Goa accident | गुजरातच्या युवकाचा गोव्यात अपघातात मृत्यू

गुजरातच्या युवकाचा गोव्यात अपघातात मृत्यू

Next

मडगाव: गुजरातातील वडोदरा येथील एका युवकाचा गोव्यात अपघाती मृत्यू झाला. जॉर्ज करचाप (२४) असे मयताचे नाव आहे. राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याच्या हददीतील सोनसोडो येथे स्वयम अपघातात जॉर्ज याला मरण आले. मयत वापरत असलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. या प्रकरणी सदया पोलीस तपास चालू असल्याची माहिती मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांनी दिली.
आल्जिरा हॉल नजिक काल सोमवारी दुपारी अपघाताची ही घटना घडली. मयत दुचाकी घेउन जात असताना तोल गेला व त्याने एका घराच्या कुंपणाला धडक दिली व तो रस्त्यावर पडला व मरण पावला. मृतदेह बांबोळी येथील गोमेकॉच्या शवागारात ठेवला आहे. मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अपघात ठिकाणी जाउन पंचनामा केला.
 

Web Title: Gujarat youth dies in Goa accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.