लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिरोडा येथे 'शिव कामाक्षी प्रतिष्ठान'तर्फे ३० रोजी नववर्षाभिनंदन सोहळा होणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त पहाटे ५:३० वाजता रवळनाथी शिरोडा येथील श्री रवळनाथ मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. शिरोडा परिसरातील सर्व वाड्यांवर शोभायात्रा पोहोचणार आहे. शिवगडावर येथे गुढी उभारून नव वर्षाचे स्वागत, तेथील श्री शिवलिंगाची विधिवत पूजा, आरती व तीर्थप्रसाद व मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाईल.
शिरोड्यातील सर्व सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आध्यात्मिक, क्रीडा व सांस्कृतिक संस्थांच्या सहकार्याने होणाऱ्या या सोहळ्याच्या यशस्वी आयोनना करिता डॉ. सुभाष प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समितीची निवड करण्यात आली आहे.
समितीमध्ये उपाध्यक्ष डॉ. संदीप प्रभुगांवकर, प्रकाश सदाशिव नाईक सचिव लक्ष्मण नाईक, सहसचिव-महादेव नाईक खजिनदार महेश पाटील, उपखजिनदार वैभव नाईक सदस्य सुभाष नाईक, अच्युत नाईक, शरण्य शिरोडकर, महादेव च्यारी, खुशाली नाईक, मनोज नाईक, शौरिश नाईक, नागेश नाईक, योगेश मिरिंगीकर, राजू नाईक, सुरज नाईक, साहिल नाईक, प्रथम नाईक, रत्नाकर शिरोडकर, शैलेश नाईक, दशरथ नाईक, भावेश नाईक, त्रंबक नाईक, विनोद प्रभुदेसाई, समर्थ नाईक, सत्यम नाईक, उत्कर्ष नाईक, विपुल कवळेकर, संदेश नार्वेकर, सुदाम नाईक, आनंद नाईक यांचा समावेश आहे.
३० मार्चला सायंकाळी पाच वाजता श्री रवळनाथ मंदिराच्या सभागृहात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचे प्रबोधन व सायंकाळी ६ वाजता चैत्र सांज हा भावगीत भक्तिगीत व नाट्यगीताचा सुरेल कार्यक्रम सादर होणार आहे. यावेशी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष प्रभुदेसाई यांनी केले आहे.
सायंकाळी प्रबोधन, चैत्र सांज कार्यक्रम
बाजार-शिरोडा येथील श्री आप्टेश्वराच्या पेडावर गुढी उभारून शोभायात्रेची सांगता होणार असल्याचे शिरोडा नववर्षाभिनंदन सोहळ्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष प्रभुदेसाई यांनी सांगितले.