गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 20:58 IST2020-11-07T19:13:04+5:302020-11-07T20:58:39+5:30
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम 504, 507 आणि 384अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा नोंद
पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठार मारण्याची धमकी देण्याचा मसेज त्यांच्या फोनवर आला आहे. या प्रकरणात पणजी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव आत्माराम बर्वे यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. विशेष म्हणजे धमकीचे मेसेज देणारा कोण, याचे नाव तक्रारीत नाही. अज्ञाताच्या विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. 5732038836 या क्रमांकावरून धमकीचा मेसेज आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंडसंहिता कलम 504, 507 आणि 384अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे. त्या फोन क्रमांकचा तपशीलही मिळविण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत.