गोव्यात २०२४ पासून श्रीराम नवमीची सार्वजनिक सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:49 PM2023-10-26T14:49:23+5:302023-10-26T14:50:17+5:30

गेल्या वर्षी रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी गोवा सरकारने दिली नसल्याने गोव फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. 

Government of Goa declared Shriram Navami public holiday from 2024 | गोव्यात २०२४ पासून श्रीराम नवमीची सार्वजनिक सुट्टी जाहीर

गोव्यात २०२४ पासून श्रीराम नवमीची सार्वजनिक सुट्टी जाहीर

- नारायण गावस

पणजी: राज्य सरकारतर्फे यंदा २०२४ पासून श्रीराम नवमीची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे यावर्षी बुधवार, १७ एप्रिल २०२४ श्रीराम नवमी आहे. त्या दिवशी सुट्टी असेल, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या वर्षी रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी गोवा सरकारने दिली नसल्याने गोव फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. 

भाजपचे नेते हे श्रीरामाच्या नावाने मते घेतात. पण त्यांच्या उत्सवात सुट्टी देत नाही असे सांगितले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी या वर्षापासून आम्ही सुट्टी विषयी विचार करणार असे आश्वासन दिले होते. त्यामुळे पुढच्या वर्षापासून आता ही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे विविध  धार्मिक सण तसेच इतर महोत्सव  मिळून १७ सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जायच्या. आता पुढील वर्षापासून त्यात आणखी एका सुट्टीची भर पडणार आहे. २०२४ मध्ये सरकारने श्रीराम नवमीची सुट्टी जाहीर केल्याने सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या आता १८ होणार आहे.  

शेवटी मागणीला यश: विजय सरदेसाई 
रामनवमीला सुट्टी देण्याबाबत विधानसभेत आणि मार्चमध्ये मुख्य सचिवांना लिहिलेल्या माझ्या पत्राला यश आले आहे. गोवा सरकारने शेवटी माझा युक्तिवाद मान्य केला आहे. गोव्यातील लोक ज्या भक्ती आणि श्रद्धेने परमेश्वराला मानतात त्यासाठी या सुट्टीला आग्रह केला होता. प्रभू राम यांचा राजकीय सोयीसाठी वापर केला जाऊ नये, तर त्यांचे जीवन आपल्यासाठी कायम असलेल्या प्रासंगिकतेसाठी पूजनीय आणि साजरे केले पाहिजे, हे भाजपला पटवून देणे आवश्यक होते. शेवटी सरकारला लाेकांच्या भावना विश्वासात घ्याव्या लागल्या, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी  ट्विट करुन स्पष्ट केले आहे.
 

Web Title: Government of Goa declared Shriram Navami public holiday from 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा