शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

गोमेकॉत ऑक्सिजनचा तुटवडा : डीन बांदेकर यांची कबुली, खंडपीठाने सरकारला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 7:38 AM

कोविडमुळे लोक आजारी पडत असले तरी ऑक्सिजनअभावी ते मृत पावतात, ही गोमेकॉतील धक्कादायक वस्तुस्थिती न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे उघड झाली.

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याची स्पष्ट कबुली गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर दिली. हाय फ्लो नेसल उपकरणाद्वारे ऑक्सिजनचा (एचएफएनओ) पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. परंतु त्याद्वारे अधिक ऑक्सिजन जात असल्यामुळे ते वापरले जात नाही, अशी धक्कादायक माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे गोमेकॉत दररोज ५० हून अधिक रुग्ण का मृत पावतात, याचा उलगडा झाला. कोविडमुळे लोक आजारी पडत असले तरी ऑक्सिजनअभावी ते मृत पावतात, ही गोमेकॉतील धक्कादायक वस्तुस्थिती न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे उघड झाली. मंगळवारी गोमेकॉत तब्बल ४०० ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासल्याची माहिती गोमेकॉच्या नोडल अधिकाऱ्यांनी खंडपीठाला दिली. गोमेकॉत एकूण ३२० रुग्ण हे सिलिंडरमधील ऑक्सिजनवर होते, तर १६० रुग्ण हे पाईपलाईनद्वारे सुरू असलेल्या ऑक्सिजनवर होते, असे या अधिकाऱ्यांनी खंडपीठाला सांगितले. गोमेकॉला दर दिवसा ५०० सिलिंडरची आवश्यकता भासत असल्याची माहिती त्यांनी दिली. गोमेकॉतील ऑक्सिजनची गरज आणि होणारा पुरवठा याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा आदेश खंडपीठाने गोमेकॉला दिला होता. बुधवारपर्यंत याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता होती. परंतु गोमेकॉने याविषयी प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे खंडपीठाने या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली आणि आताच्या आता गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. अ‍ॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी एका वकिलामार्फत डॉ. बांदेकर यांना तात्काळ संपर्क करण्यास सांगितले.

बस्स करा हे आता...  न्यायालयाने सुनावलेयावेळी सरकारच्या एकंदरीतच कारभारावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कधी म्हणता ऑक्सिजन आवश्यक प्रमाणात आहे; पण रिकामे सिलिंडर नाहीत. रिकामे सिलिंडर्स आणून दिल्यास सांगता ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात नाही. बस्स करा हे आता... अशा शब्दांत न्यायमूर्ती महेश सोनक आणि नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने सरकारला खडसावले. 

७२ ट्रॉली पुरविणे अशक्यगोमेकॉला दरदिवसा जवळपास ५०० सिलिंडरची म्हणजेच सुमारे ७२ ट्रॉलींची आवश्यकता आहे. इतका पुरवठा करण्याबाबत महसूल सचिवांनी न्यायालयात असमर्थता व्यक्त केली. 

 आज रात्री काळजी घ्या.... बुधवारी आणि गुरुवारी रात्री ऑक्सिजनअभावी कुणीही मरणार नाही याची खात्री घ्यावी, असा आदेश खंडपीठाने गोमेकॉला दिला. हा परीक्षेचा काळ असल्याचेही खंडपीठाने गोमेकॉला बजावले आहे.

म्हणून रुग्ण मरतातरात्री २ ते ६ या वेळेतच रुग्ण अधिक प्रमाणात का दगावतात? असा प्रश्न खंडपीठाने गोमेकॉच्या डॉक्टरांना केला. त्यावेळी डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले, ते असे: ‘पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेल्या रुग्णांची प्रकृतीही फार नाजूक असते. या रुग्णांना ऑक्सिजनचा सतत पुरवठा हवा असतो. एचएफएनओची व्यवस्था आहे. परंतु त्यामुळे ऑक्सिजन अधिक प्रमाणात लागत असल्यामुळे ती यंत्रणा वापरली जात नाही.’ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस