शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

विर्डीला गोव्याची हरकत

By admin | Updated: June 2, 2014 01:45 IST

धरणाला विरोध : राज्य सरकार आज याचिका सादर करणार

पणजी : महाराष्ट्र सरकारने विर्डी धरणाच्या चालवलेल्या बांधकामाला पाणी तंटा लवादासमोर हरकत घेणारी याचिका गोवा सरकारतर्फे सोमवारी सादर केली जाणार आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी यास दुजोरा दिला. या याचिकेवर रविवारी त्यांनी अंतिम हात फिरवला. शेजारी महाराष्ट्राच्या दोडामार्ग तालुक्यात धरणाचे हे बांधकाम चालू आहे. हे धरण झाल्यास वाळवंटी नदीच्या प्रवाहाला बाधा येईल, असे गोवा सरकारचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांना हा प्रकार म्हादई जल तंटा लवादाच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश अलीकडेच दिले होते. जलस्रोत खात्याचे अधीक्षक अभियंता आर. येरागट्टी यांच्या म्हणण्यानुसार, या नदीतून उत्तर गोव्यासाठी रोज ८२ एमएलडी पाणीपुरवठा करणारी व्यवस्था कार्यरत आहे. याशिवाय तीन मोठ्या सिंचन योजना १६ पंप आहेत आणि औद्योगिक वापरासाठीही या पाण्याच्या मोठा उपयोग होतो. कत्तिका नाल्यावरील धरणाने महाराष्ट्र सरकारला १४.१३८ घनमीटर पाणी साठवण्याची व्यवस्था करायची आहे. २00६ साली पावलाची कोंड येथे गोवा हद्दीपासून अवघ्या ५00 मीटर अंतरावर काही अटींवर धरण बांधण्यास अनुमती देण्यात आली होती. अतिरिक्त पाणी अंजुणे धरणाला वळविण्याची प्रमुख अट होती; परंतु गोव्याला अंधारात ठेवून धरणाची जागा बदलण्यात आली. दरम्यान, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार उसप, खोक्रल, पिकुळे, झरेबांबर या गावांना पाणी मिळत नाही. हे धरण झाल्यास पाण्याची समस्या सुटणार आहे. त्यामुळे विर्डी धरणाची उंची वाढवावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडे आपले प्रयत्न चालू आहेत. मंत्रिमंडळानेही त्यास मान्यता दिलेली आहे. कर्नाटकसारखे आम्ही काही जबरदस्तीने बांधकाम चालविलेले नाही. हा प्रकल्प संयुक्त असल्याने वाटाघाटींद्वारे प्रश्न सुटू शकतो व त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)