विकासात जि.पं.ची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:58 IST2025-12-17T11:56:36+5:302025-12-17T11:58:15+5:30
मुख्यमंत्री म्हणाले, ही जिल्हा पंचायत निवडणूक २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी खूप महत्त्वाची आहे.

विकासात जि.पं.ची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: राज्यात यापुढे जिल्हा पंचायतींना मुख्य प्रवाहात आणण्यात येणार असून, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी सामुदायिक शेतीची जबाबदारी देण्यात येणार आहे. जिल्हा पंचायत या महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरगाव येथे सांगितले.
यावेळी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, हरमल जिल्हा पंचायत मतदारसंघ उमेदवार मनीषा कोरखणकर, भाजप सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकर, कोरगाव सरपंच देवीदास नागवेकर, गोविंद पर्वतकर, पंच अनुराधा कोरगावकर, तोरसे सरपंच पूजा साटेलकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ही जिल्हा पंचायत निवडणूक २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी खूप महत्त्वाची आहे. सामुदायिक शेतीची जबाबदारी यापुढे जिल्हा पंचायतीकडे दिली जाईल. त्यामुळे शेती, बागायती उत्पादनाला नवीन उंची मिळणार आहे आणि बाजारपेठेच्या माध्यमातून हजारो रोजगार मिळणार आहेत. स्वयंपूर्ण गोवा होण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून, जिल्हा पंचायत सदस्य हे सरकार आणि लोकांमध्ये महत्त्वाचा धुवा ठरणार आहे.
आमदार आर्लेकर म्हणाले, कोरगाव पंचायत क्षेत्रात ५७०० सर्वाधिक मतदार आहेत. या पंचायत क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात मतदारांचा मनीषा कोरखणकर यांना पाठिंबा मिळत आहे.