BJPतून ज्यांची हकालपट्टी त्यांनाच काँग्रेसचे तिकीट, प्रत्यक्षात B टीम कोण ते समजावे?; आपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:38 IST2025-12-17T11:38:35+5:302025-12-17T11:38:59+5:30
भाजपने ज्या दहा पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती, त्यापैकी दोघाजणांना काँग्रेसने निवडणुकीसाठीची तिकीट दिले.

BJPतून ज्यांची हकालपट्टी त्यांनाच काँग्रेसचे तिकीट, प्रत्यक्षात B टीम कोण ते समजावे?; आपची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपने ज्या दहा पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती, त्यापैकी दोघाजणांना काँग्रेसने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीची तिकीट दिले. यावरून कोण कुणाची 'बी' टीम? हे सिद्ध होते, अशी टीका आम आदमी पक्षाचे नेते श्रीकृष्ण परब यांनी पत्रकार परिषदेत केली. आमच्यावर अनेकदा भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप होतो. मात्र, प्रत्यक्षात कुठला पक्ष भाजपची 'बी' टीम आहे, हे वरील घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते श्रीकृष्ण परब यांनी केली.
परब म्हणाले की, काँग्रेसला मारलेले मत म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपला मत मारणे आहे. भाजप विरोधात केवळ आम आदमी पक्षच लढा देत आहे. आम्ही जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ५० पैकी ४२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. अन्य आठ जागांवर काही उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीसाठी रस्ता, पाणी, वीज असा पायाभूत सुविधांचा विषय हा प्रमुख मुद्दा आहे. त्या आधारेच प्रचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बेकायदेशीर क्लबवर कारवाई हवीच
याशिवाय काही ठिकाणी आम्ही प्रचारासाठी गेलो असता नोकऱ्यांचा विषयही समोर आले. लोकांसाठी रोजगार हा महत्त्वाचा विषय आहे. दरम्यान, हडफडे अग्नीकांडानंतर बेकायदेशीर क्लब, पबचा विषय ऐरणीवर आला. त्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे मत परब यांनी व्यक्त केले. यावेळी पक्षाच्या कळंगुटच्या उमेदवार कॅरोल फर्नाडिस उपस्थित होत्या.