सनातन धर्माची गोवा ही राजधानी व्हावी: विश्वजीत राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:05 IST2025-04-04T12:04:50+5:302025-04-04T12:05:25+5:30
केरी-सत्तरी व वाळपई येथे भाजपचा मेळावा उत्साहात

सनातन धर्माची गोवा ही राजधानी व्हावी: विश्वजीत राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, केरी-सत्तरी : सनातन धर्माची पुनर्स्थापना गोव्याहून होईल. गोवा ही सनातन धर्माची राजधानी व्हायला हवी, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
केरी-सत्तरी व वाळपई येथे भाजपचे दोन मेळावे झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिव्या राणे व अन्य नेते उपस्थित होते, दोन्ही ठिकाणी भाजप कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले की सनातन धर्माची पुनर्स्थापना होण्याची प्रक्रिया सत्तरी तालुक्यातून व उसगावमधून सुरू होईल. सनातन धर्म अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायला हवा. भारतीय संस्कृतीची महती सनातन धर्मातून कळून येते. मंत्री राणे यांनी केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाचे स्वागत केले. वक्फ सुधारणा विधेयक संसदेत संमत झाले आहे. या विधेयकाला गोव्याचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मंत्री राणे म्हणाले. दरम्यान, या विधेयकाचा संबंध धर्माशी नव्हे तर मालमत्तांशी आहे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.