गोवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 10:11 IST2018-06-09T10:10:30+5:302018-06-09T10:11:02+5:30
गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार शांताराम नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे.

गोवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांचे निधन
गोवा - गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार शांताराम नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. वयाच्या 73 व्या वर्षी शांताराम नाईक यांनी अखेरचा श्वास घेतला. मार्गाव येथे शनिवारी (9 जून) सकाळी 6.30 वाजता नाईक यांचे निधन झाले. नाईक यांच्या पार्थिवावर रविवारी (10 जून) सकाळी 11 वाजता कंकोलिम येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार होतील.
1984 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार राहिले होते. 1967 मध्ये नाईक यांनी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली.
शांताराम नाईक यांच्या निधनावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे. ''गोवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शांताराम नाईक यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला दुःख झाले. नाईक यांनी गोवा राज्याच्या लढाईमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नाईक यांच्या आत्म्यास शांती लाभो'', अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
I’m sorry to hear about the passing away of Shri Shantaram Naik, former Goa Congress Chief, MP and senior Congress leader, who played an important role in the battle for Goa’s statehood. My condolences to his family in their time of grief. May his soul rest in peace.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 9, 2018
Goa: Former Congress MP Shantaram Naik passed away in Margao this morning, after suffering a heart attack. pic.twitter.com/JEDS0TFDg6
— ANI (@ANI) June 9, 2018