शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गोवा अबकारी खात्याची नाचक्की

By admin | Updated: April 16, 2015 01:28 IST

पणजी : गोव्याहून तेलंगणा येथे १ कोटी रुपयांची बनावट दारूचा पुरवठा केला जातो आणि गोव्याच्या अबकारी खात्याला याचा मागमूसही लागला नाही

पणजी : गोव्याहून तेलंगणा येथे १ कोटी रुपयांची बनावट दारूचा पुरवठा केला जातो आणि गोव्याच्या अबकारी खात्याला याचा मागमूसही लागला नाही. तेलंगणा अबकारी खात्याने गोव्यात येऊन या प्रकरणातील संशयितास ताब्यात घेऊन चौकशीस नेले. या प्रकारामुळे अबकारी खात्याबरोबरच गोवा सरकारचीही नाचक्की झाली आहे. खोर्ली-म्हापसा येथील नॅशनल डिस्ट्रीलरीतून या दारूचा पुरवठा केला जात होता. दारूत नशा आणणारा बर्न्ट शुगर हा पदार्थ मिसळून त्याचा पुरवठा केला जात होता. हा प्रकार बराच काळ सुरू होता, अशी माहिती तेलंगणाच्या अबकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तेलंगणा येथे बनावट दारूचे चार ट्रक पकडण्यात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि ही दारू गोव्याहून पुरविली जात असल्याचे उघडकीस आले. तेलंगणाचे अबकारी अधिकारी गोव्यात येऊन नॅशनल डिस्ट्रीलरीचे मालक नील मोंतेरो यांना पकडून घेऊन जाईपर्यंत गोव्याच्या अबकारी खात्याला या प्रकाराची भनकही लागली नव्हती, याची कबुली अबकारी आयुक्त मिनीन डिसोझा यांनी दिली. तेलंगणा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतरच हे खात्याच्या लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. तस्करी रोखण्यासाठी तसेच बनावट दारू विक्री रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय अबकारी खात्याकडून केले जातात. नॅशनल डिस्ट्रीलरीच्या आणखी एक प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे. चौकशीत दोषी आढळून आल्यास या कंपनीचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात दारूच्या तस्करीचे प्रकार काही नवे नाहीत. बोगस दारूची निर्मिती करून त्याची विक्री करण्याचे प्रकार गोव्यात अनेकवेळा उघडकीस आले आहेत. वास्को द गामा डिस्ट्रीलरीच्या नावाने उत्पादने करून इतर राज्यांत दारूची विक्री करण्याचे प्रकरण गोवा विधानसभेतही गाजले होते. त्यानंतर बोगस ब्रँड निर्मितीला आळा घालण्यासाठी बाटलीवर होलोग्राम छापण्याचाही सरकारचा प्रस्ताव होता; परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. (प्रतिनिधी)