Goa Election 2022: “उत्पल पर्रिकरांसाठी पणजीतील उमेदवारी सोडेन”; ट्विट करत ‘या’ नेत्याने दर्शवली तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 08:59 IST2022-01-18T08:58:19+5:302022-01-18T08:59:50+5:30
Goa Election 2022: भाजपने पणजीत बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर उत्पल यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

Goa Election 2022: “उत्पल पर्रिकरांसाठी पणजीतील उमेदवारी सोडेन”; ट्विट करत ‘या’ नेत्याने दर्शवली तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्यास त्यांच्यासाठी आपण पणजीतील उमेदवारी सोडण्यास तयार असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष वाल्मिकी नायक यांनी म्हटले आहे. आपचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रिकर यांना आपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतर नायक यांनी ट्वीट करून उमेदवारी सोडण्याची तयारी दर्शवली आहे.
भाजपने पणजीत बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी निश्चित केल्यानंतर उत्पल यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. आपल्या समर्थकांसह त्यांनी प्रचारही सुरू केला आहे.