Goa Election 2022: “आम्ही नाही, उत्पल पर्रिकरांनी भाजपला दूर केले”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 09:42 PM2022-02-11T21:42:19+5:302022-02-11T21:43:27+5:30

Goa Election 2022: उत्पल पर्रिकरांचा निर्णय राजकीय करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

goa election 2022 devendra fadnavis said that we did not removed utpal parrikar from bjp he took decision of separate | Goa Election 2022: “आम्ही नाही, उत्पल पर्रिकरांनी भाजपला दूर केले”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Goa Election 2022: “आम्ही नाही, उत्पल पर्रिकरांनी भाजपला दूर केले”; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Next

पणजी: गोवा विधासभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत चालल्याचे पाहायला मिळत आहे. विविध पक्षांचे नेते, स्टार प्रचारक गोव्यात ठाण मांडून बसले आहेत. भाजपचे गोवा निवडूक प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अनेक दिवसांपासून गोव्यातील विविध भागात प्रचारावर भर देताना पाहायला मिळत आहेत. यातच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना उत्पल पर्रिकर यांच्या बंडखोरीबाबत विचारणा करण्यात आली. तसेच पणजीतील मतमोजणीनंतरही उत्पल पर्रिकर यांना भाजपचे दरवाजे खुले असतील का, असा सवाल करण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले. 

माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात अनेक विकासकामे केली. योजना यशस्वीपणे राबवल्या, असे सांगताना उत्पल पर्रिकर यांच्या निर्णयामुळे भाजप अडचणीत येणार नाही. मात्र, उत्पल यांच्या राजकीय करिअरवर प्रश्नचिन्ह उभे राहील आणि याचे आम्हाला दुःख आहे. याचे कारण मनोहर भाईंशी आमचे असलेले संबंध हे भावनिक आहेत. तो आमचा परिवार आहे. भाजपही आमचाच परिवार आहे. आमच्या परिवारातील एक घटक आमच्यापासून दूर गेला, याचे आम्हाला दुःख आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

आम्ही नाही, उत्पल पर्रिकरांनी भाजपला दूर केले

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला दुःख झाले आहे, हे खरे आहे. पण, उत्पल यांना भाजपने दूर केलेले नाही. उत्पल यांनी भाजपला दूर केले आहे. उत्पल यांना आम्ही तीन जागांची ऑफर दिली होती. त्यातील एक जागा सातत्याने निवडणून येणारी होती. एवढेच नाही, तर उत्पल यांना सांगितले होते की, आता आमदार व्हावे आणि पाच वर्षांनी पुन्हा पणजीतून उमेदवारी देऊ. मग, पुन्हा तेथून निवडून यावे. अशा प्रकारची सकारात्मक ऑफर भाजपने उत्पल यांना दिली असतानादेखील त्यांनी स्वतः निर्णय करणे की, मला स्वतंत्र उभे राहायचे आहे, हे दुःखद असून, त्यांच्या राजकीय करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. ते टीव्ही ९ शी बोलत होते. 

दरम्यान, पणजीतील मतमोजणीनंतरही उत्पल पर्रिकर यांना भाजपचे दरवाजे खुले असतील का, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पणजीत भाजपचा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येईल, हे आत्मविश्वासाने सांगतो. इतकेच नाही, तर भाजपलाही गोव्यात पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 
 

Web Title: goa election 2022 devendra fadnavis said that we did not removed utpal parrikar from bjp he took decision of separate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.