Goa Election 2022 : पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 08:17 PM2022-01-25T20:17:58+5:302022-01-25T20:27:26+5:30

लोबो यांनी भाजप नेत्यांचा, पक्षाचा विश्वासघात केला, सिक्वेरा यांची टीका

goa election 2022 According to Parrikar have worked for lobo joseph sequeira pramod sawant | Goa Election 2022 : पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा

Goa Election 2022 : पर्रीकरांच्या सांगण्यावरुन लोबो यांच्यासाठी काम केले होते: सिक्वेरा

Next

पणजी: "माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरुन मागील निवडणूकीत मायकल लोबो यांच्यासाठी निवडणुकीत काम केले. त्यांना निवडून आणले. मात्र त्यांनी भाजप नेत्यांचा, पक्षाचा विश्वासघात केला," अशी टीका भाजपमध्ये प्रवेश केलेले जोसेफ सिक्वेरा यांनी पत्रकार परिषदेत केली.

"सिक्वेरा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. राज्य तसेच मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. देश, राज्य व लोक प्रथम हे घोषवाक्य घेऊन आम्ही पुढे जात आहोत," असं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

मात्र मायकल लोबो यांना पत्नी प्रथम आहे. त्यांच्या पत्नीला शिवोलीचे तिकीट नाकारल्यानेच त्यांनी भाजप पक्ष सोडला. मात्र निवडणुकीत जनता त्यांना शिवोली तसेच कळंगुट येथे नक्कीच धडा शिकवील असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: goa election 2022 According to Parrikar have worked for lobo joseph sequeira pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.