Goa: गोव्यात तुयें येथे येणार प्लास्टिकपासून इंधन बनवणारा देशातील पहिला प्रकल्प
By किशोर कुबल | Updated: September 26, 2023 14:08 IST2023-09-26T14:08:26+5:302023-09-26T14:08:49+5:30
Goa News: देशातील पहिला प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्प गोव्यात तुयें, पेडणे येथे येत्या ३० ॲाक्टोबरपर्यत कार्यान्वित होणार असून, प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

Goa: गोव्यात तुयें येथे येणार प्लास्टिकपासून इंधन बनवणारा देशातील पहिला प्रकल्प
- किशोर कुबल
पणजी - देशातील पहिला प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्प गोव्यात तुयें, पेडणे येथे येत्या ३० ॲाक्टोबरपर्यत कार्यान्वित होणार असून, प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
पालिका प्रशासनमंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली. १० टन प्रतिदिन प्लास्टिक कचरा येथे वापरला जाईल. कचरा गोळा करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी १०० कलेक्शन पॉइंटस उभारण्याची सरकारची योजना आहे, असे राणे म्हणाले. नोव्हेंबर २०१४ मध्ये ‘सुडा’ने एका खाजगी कंपनीमार्फत प्लास्टिक कचरा ते इंधन प्रकल्प सुरू केला होता आणि प्रकल्पावर ८ कोटी रुपये खर्च केले होते. सध्या हजारो टन प्लास्टीक कचरा कर्नाटकला पाठवला जातो.
राणे म्हणाले की,‘ हा प्रकल्प एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, आम्ही एक वर्षभर निरीक्षण करू.जर सुरळीतपणे कार्य करत असेल तर गोव्यात इतर ठिकाणीही असेच प्रकल्प उभारले जातील.
खाजगीकरण नव्हेच : विश्वजित
दरम्यान, आरोग्यमंत्री या नात्याने बोलताना मंत्री विश्वजित राणे म्हणाले कि, दक्षिण जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण केले जाणार नाही तर तेथे वैद्यकीय महाविद्यालय गरजेचे आहे असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी इतर राज्यातील सर्वोत्तम पद्धती आणि मॉडेल्सची तपासणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने एक समिती स्थापन करण्यासाठी फाइल पाठवली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही सर्वोत्तम खाजगी भागीदार शोधत आहोत, असे ते म्हणाले. विश्वजित पुढे म्हणाले कि,‘ या इस्पितळाचे खाजगीकरण नव्हे तर खाजगी शैक्षणिक संस्था त्याला जोडल्या जातील.