शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनाला पेडण्यातून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 21:04 IST

भाजपा सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक

म्हापसा : राज्यात सरकार आहे की नाही, याची गोवेकरांना माहितीच नाही. लोकशाहीचा खून करू पाहणाऱ्या भाजपा सरकारला आता गोमंतकीयांनी कायमचेच घरी बसवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी काँग्रेसच्या जन आक्रोश आंदोलनातून पेडणे येथे केले.खाण घोटाळा गेला कुठे, काळा पैसा देशात आला का, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये आले का, असे प्रश्न चेल्लाकुमार यांनी उपस्थित केले. भाजपाने खोटारडेपणाचा कळस गाठला असून जनतेचा उद्रेक वाढण्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आजारी सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे, असे ते म्हणाले. गोवा प्रदेश कॉँग्रेस व पेडणे गट कॉँग्रेस समिती आयोजित जन आक्रोश आंदोलन पेडणेतील टॅक्सी स्टॅन्डवर आयोजित करण्यात आले. त्यावेळी डॉ. चेल्लाकुमार बोलत होते. आंदोलनाला गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी शिक्षण मंत्री संगीता परब, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, उपाध्यक्ष बाबी बागकर, सचिव सुभाष केरकर, पेडणे गट कॉँग्रेस अध्यक्ष उमेश तळवणेकर, दिव्या शेटकर, उत्तर गोवा महिला अध्यक्ष वैशाली शेटगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. गोवा कॉँग्रेस प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी यावेळी बोलताना २०१२ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने खोटी आश्वासने देऊन मागच्या दाराने सत्ता मिळवली. राज्याला खास दर्जा देण्याच्या खोट्या आश्वासनाला हरताळ फासले. गोवेकरांना फसवण्याचा हातखंडा मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे आहे असा दावा करून गोवेकरांना फसवण्यासाठी रथयात्रा, परिवर्तन यात्रा काढली आणि सत्ता मिळवली. सत्ता मिळताच जनहित विसरले. १०० दिवसात काळा पैसा आणण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाने गोवेकरांना फसवल्याचा दावा चेल्लाकुमार यांनी केला. खनिज व्यवसाय बंद केला. बेरोजगाराना रोजगार नाही. दिलेली १० टक्के आश्वासने भाजपाने पूर्ण केली नाही. लुटारू भाजपाला घरचा रस्ता दाखवा असे आवाहन चेल्लाकुमार यांनी केले. पेडणे तालुक्यातून कोणतीही मोहीम किंवा आंदोलन केले तर ते यशस्वी होते आणि सतत पेडणेतील जनता प्रत्येकवेळी वेगळा इतिहास गोवेकरासमोर ठेवत असते, म्हणूनच जन आक्रोश आंदोलनाची सुरुवात पेडणे तालुक्यातून केल्याची जवळ जवळ सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणात केले. यावेळी सरकार चालवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर येण्याची तसेच सरकार चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बनावट सही वापरण्यात येत असल्याचा आरोप गिरीष चोडणकर यांनी केला. यावेळी सभेत गोमंतकीय गरीब जनतेला संकटात टाकणाऱ्या सरकार विरोधात हे जन आक्रोश असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा सरकार बरखास्त करावे अशी मागणी करणारा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

टॅग्स :congressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा